Sunday, December 2, 2018

अमेरिका -४

अमेरिका -४


फारा दिवसाने इथे ऊन पडलं, इतके दिवस नुसता पाऊस , आज जरा हायस झालं . इथे वेध शाळा सरकारी नाहीये त्या मुळे अंदाज एकदम अचूक , अमुक वाजता पाऊस आणि उद्या शनिवारी ऊन आणि अगदी तसंच, तो टीव्ही वरचा सांगणारा उगाच आगाऊ होता पण अंदाज खरा, मी पण मस्त उन्हात फेऱ्या मारल्या, मुंबईकर म्हंटला कि १८ म्हणजे थंडी इथे ६ होत तापमान , पण ऊन होत , म्हणून मी बागडलो . 

वाण सामान आणायला ११ ला बाहेर पडलो, (नेहमी सारखे खूप कपडे घालून), uber केली आणि "पटेल ब्रदर्स" मध्ये गेलो . ही एक चेन आहे अमेरिका भर . कौतुक आहे ह्यांचं , गुजरात मध्ये खर तर पैसा आहे, तरी बाहेर पडून धडपड करून काहींना काही तरी करतात . सगळी माणसं दुकानात आपली भारतीय होती आणि वस्तू पण, नाही म्हणायला एक गोरी मुलगी आपल्या गुजराती मित्राबरोबर आली होती, पण बाकी सारे देशी. बेडेकर आणि चितळे दिसले, बरं वाटलं. बाकी दुकान अगदी आपल्या सारखं फक्त किंमत डॉलर्स मध्ये आणि सगळ्या गोष्टी किलो भर अर्धा किलो पाव किलो नाहीसच तो ब्रेड पण ५० स्लाइस चा , (ही लोक किती खातात यार!) सगळंच खूप जास्त  ... पण बाकी सगळ्या गोष्टीआपल्या सारख्याच , अगदी मॅगी सुद्धा ... रेडी मेड पोळ्या गरम करा आणि खावा (एकदम बेस्ट ), चिरलेली भाजी , अगदी खोबर सुद्धा ते सुद्धा खाणलेल (थोडं महाग आहे, पण ठीके ,  आयत मिळतय ते काय कमीये?). 

आपल्या इथून काही जास्त आणायची गरज नाही, (उगाच वजनाचं टेन्शन चायला.), आठ दिवसात दुकान मिळेल. 

एक महत्वाचं म्हणजे इथे यूरोप सारखं पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आणि फूटपाथ पण नाहीत , गाडी नसेल तर फार पंचाईत . तरी आता उबर आहे, आधी लोक काय करायची कुणास ठाऊक? यूरोपात लोक चालतात आणि सायकल फिरवतात इथे फक्त गाडी एके गाडी....  बस नाही कि ट्रेन नाही , फूट पाथ तिथे दहा फुटी, इथे अजिबात नाही . फक्त शिस्त मात्र तीच , तिथे फक्त लोक आपण हून थांबून तुम्हाला रस्ता ओलांडू देतात इथे नाही तस ... पण इथे सगळंच वेगळं पण तरी आपल्या सारखं .... 









No comments: