स्पिती - हिमाचल ६
चंद्रताल चा जायचा रस्ता अति भयानक, म्हणजे खूप खराब आहे, नाहीच म्हणा ना. खूप खडतर जागा पण डोंगराळ, वेडा वाकडा रस्ता .... एक एक करत पांडव खाली पडले ते नवल नाही. आता तरी रस्ता आहे इतक्या हजारो वर्षां पूर्वी तर काहीच नसेल आणि तो डोंगर, आपण कधी काळी काही वाचलं असतं आणि असं अचानक हे असं समोर आलं ना कि वाटतं हा यार हे तर खरं निघालं.
चंद्रताल म्हणजे जिथून पांडव स्वर्गात चालत गेले, (म्हणजे एकटा धर्मराजच शेवटी उरला)ते ठिकाण ... साधारण ३ एक महिनेच फक्त इथे वावर असतो बाकी बर्फ, रस्ता बंद. म्हणून असेल म्हणा, पण रस्ता करतच नाहीत हि लोक. एका तास भर अंतरा करता दोन चार तास जातात , आणि वाहन बंद पडलं काही टायर पंक्चर झाला तर संपलच हो सगळं. पण वरती त्या लेक जवळ, तिथे टेन्ट्स टाकतात लोकं आणि भाड्याने देतात खाणं वगैरे सगळंच. अश्याच एका तंबूत आम्ही आमच्या ब्यागा टाकल्या आणि गाडीत बसून दहा मिंट वर गेलो आणि परत गाडी लाऊन १५ मिनिट तंगड तोड करून चंद्रताल ला पोचलो. चंद्रताल एकक तलाव आहे (lake). खूप सुंदर अति सुंदर दृश्य चहू बाजूला डोंगर मध्ये निळा शार तो तलाव. त्याचा आकार चंद्रा सारखा आहे म्हणून नाव चंद्रताल असं म्हणतात खरं खोटं माहित नाही , पण रात्री चंद्राचं प्रतिबिं छान दिसतं (असेल पण मी गारठून माझ्या टेन्ट मध्ये ३ स्वेटर tshirt thermal आणि दोन blanket घेऊन कुडकुडत होतो). आम्ही नाही पाहिलं . इथून खरं तर आकाश पण सुंदर दिसतं. खरं सांगू का , मी समुद्र सपाटी वरचा माणूस आहे, मुंबईत जन्म आणि सगळं इथेच आयुष्य गेलं. बर्फ ग्लासात आणि थंडी फ्रीझर मध्येच. असं आता अचानक तुम्ही मला धीट हो म्हंटल आणि जा बिन्धास म्हंटल तर कसं चालेल? (९:१८ ला window पकडायचो लेको, गाडीत शिरून दाखवा मग बोला थंडी बद्दल, ज्यादा बोलियाचं काम न्हाय काय समाजलाव ).
आम्ही त्या तलावा जवळ ...जवळ जवळ तास दीड तास घालवला, खूप शांत होतं आणि न मला व्यसन आहे पाण्याचं, इतकं सुंदर स्वछ पाणी कुठे दिसतं हल्ली? खप वेळ शान्त पणे बसलो, तिथे खरं तर लोक प्रदक्षिणा घालतात, मला एकट्याला जायला थोडं रिस्की वाटलं, (गर्दीची भीती नाही वाटत एकांताची वाटते) म्हणून फक्त एक ५०० मीटर जाऊन शांत पणे बसून राहिलो, इथे oxygen पण कमी होतं , मधेच काही धाप वगैरे लागलिओ तर ? म्हणून टाळलं, खरं तरच सहज शक्य झालं असतं ४ एक की.मी. आहे. सुकून म्हणतात ना? तो मात्र मिळाला, थोड्या वेळाने मग पर्यटक आले, खूप गोंगाट झाला. तिथे नको होता गोंगाट असं वाटलं, आम्ही परत त्या तंबूत आलो, चहा बिस्कीट खाल्लं. रात्री झोप काही नाही आली. जरा कुशी वर वळलो तर गादी गार गुट्ट , दचकून जाग कशी बशी रात्र गेली. सकाळ अतिशय सुंदर निघाली. बाकी काही का असेना इथे सकाळ खूप सुंदर असते, हिमालय खूप मोहक आहे, एकदा सवय झाली ना इथली तर खूप आवडेल मला. हलका सूर्य दिसतो थोडे पांढरे डोंगर एका मागे एक असे अनेक डोंगर , आपण कसं हिरव्या झाडांचे अनेक हिरवे रंग बघतो तसं आहे ह्या डोंगराचं ... हरवून जातो आपण , पण ऊन हवं सकाळ हवी.
इथे ना पंजाब दिल्ली वगैरे लोक खूप येतात त्या मुळे खूप ठिकाणी आम्हाला छोले पनीर मिळालं, पण इथे रात्रीचा बेत सुंदर होता, साधी मुगाची डाळ, दुधी ची भाजी आणि लाल भोपळ्याचा हलवा..पोळी भात होतच. त्याला म्हंटल अरे नवल आहे पहिल्यांदा छोले नसलेलं दिसलं मला. त्याच उत्तर फार छान होत, तो म्हणाला कि पाहाडो मे कहासे छोले आयेगा? इतक्या उंचीवर चांगलं नाही , जो जल्दी पकता है वोही जल्दी पचता है म्हणून साधं जेवण ... हि अक्कल बाकीच्यांना कधी येईल कुणास ठाऊक . सकाळी पण पोहे होते उकडलेलं अंड ... साधं होतं .
आम्ही सकाळचं खाऊन मनाली करता निघालो, अंतर फार नाही तरी पाच एक तास खडतर प्रवास.. बाकी मनाली काय टुरिस्ट आहे सगळं, गर्दी वैगेरे कमी. विशेष म्हणजे इथे घटोतकोचा चं हिडिंबेचं देऊळ आहे, इथे राहायला तेव्हा अशीच लोकं लागत असणार तेव्हा. सगळं महाभारत इथेच घडलं म्हंटल्यावर काय हो. आम्ही हॉटेलात राहिलो थोडं फिरलो आणि मग चंदीगड आणि मुंबई ....
आम्हाला इथे हॉटेलात जेवताना एक डोक्याला पट्टी असलेला साधा सुधा मुलगा शेजारच्या टेबल वर येऊन बसला , veg मे क्या है म्हंटला एकदम टिपिकल शहरातला गुजराती मुलगा. इथे कामाला आला असेल नोकरीला, पडला असेल आता घाबरला असेल म्हणून सारखे फोन हॉस्पिटल air lines घरी असं मला वाटलं .
माझ्या बॉस नि विचारलं काय लागलं? कुठचा तूच? तर पुढलं ऐकून आपण किती चुकीचे निष्कर्ष काढतो हे जाणवलं. तो गुगल मध्ये नोकरी करणारा तिशीतला amhmedabad चा मुलगा , स्पिती लोकल transport नि फिरत होता. (सगळं जे आम्ही आरामात इनोव्हा नि केलं ते) म्हणजे तो सगळीकडे लोकल transport नीच फिरतो म्हणाला, जिथे जिथे फिरला आहे ते सगळं . छन्द लग्न करण्यात रस नाहीये, घरून प्रेशर आहेच, पण छन्द. भारत भ्रमण .लोकल ट्रान्सपोर्ट, कारण लोकांशी बोलता येतं. तर हि जखम झाली मूद ला (आधी लिहिलं बघा, दिवसात एकच बस वगैरे ) , एका कुत्र्यानी उडी मारली ह्याच्यावर. हा पाइ कुठे जात होता तेव्हा, कुत्रा नाही चावला पण डोकं आपटलं --- टाके --- खूप रक्त , पण मूद ला एक बस २४ तासाने येते, डॉक्टर कुठें असणारे? मग लोंकांनी खूप मदत केली (हेच त्याला सिद्ध करायचं असेल , लोकं कशी मदत करतात) औषध लावलं पट्टी बांधली आणि एक टुरिस्ट जीप ने मनाली पर्यंत सोडलं . मग हॉस्पिटल MRI टाके सगळं ... केवढी धिटाई ... म्हणजे मला शेम्बळत वाटणारा कुणी जिगर भलताच जिगर बाज निघाला हो , आम्ही नुसतेच बोलण्यात शूर थंडीला घाबरणारे ... हि अशी तरुण मुलं भेटली ना कि मला खूप हुरूप येतो आशा वाढतात, देश पुढे चाललाय तरुण पिढी खूप धीट आणि जिगर बाज आहे हि खात्री होते ... खारीचा वाट म्हणून माझ्या बॉस नीच त्याचं बिल भरलं आणि त्याला खूप आशीर्वाद कम गुड लक दिलेत ....
आम्ही सुखरूप चंदिगढ आणि मग मुंबई ला आलो...