एक अनुभव .
आमच्या बरोबर जपान चा एक कलीग आहे मूळ हैद्राबाद , आम्ही दुपारी बाहेर जातो जेवायला ९०% सबवे कारण ते सेफ आणि बेस्ट , इथे नवीन एस्पा कबाब म्हणून त्या सबवे शेजारी पाकिस्तानी हॉटेल उघडलं आहे , मी पण दोन दिवसाने तिकडे गेलो कारण तो जपान वाला रोज जातो हलाल मटण गॅरंटी आहे म्हणून , मला त्या कबाब वाल्याने फार आठ्या आणून आणि चिडून कबाब दिला म्हणून मी परत नाही गेलो, पैसे देऊन तिरस्कार का सहन करा? तो माणूस बाकीच्या लोकांशी हसून थँक्स म्हणून देतो आणि मला मात्र चिडून दिलं ... ह्ड म्हंटलं... हा मला आलेला २५ वर्षात पाकिस्तानी माणसाचा पहिला अनुभव (मी लै देश पाहिलेत, म्हणून पहिला म्हणालो, बाकीचे खूप वेगळे आहेत).
पर्वा कोल्स मध्ये (कोल्स म्हणजे आपलं dmart , पण गर्दी कमी कारण लोक संख्या कमी), एक आपला (brown skin ), माणूस अदबीने हसला मी पण हसलो , मग काउंटर वर जाताना तोच माणूस पुढे होता, मुझे आपको देख के लगा जैशन्करजी है (minister आपले )(पु लं म्हणतात तसं वहिदा रहमान आणि कानन बाला मध्ये दोघी बायका ह्या पलीकडे साम्य नाही तस झालं मला), मी उगाच हाहाहा केलं (मी घरी येऊन दोनदा फोटो पहिला त्यांचा, काय साम्य आहे का म्ह्णून, नाही दिसलं), इथे कसा असेल जयशंकर? म्हणालो मी, हॅलो मी सागर , तुम्ही कुठले मी आसिफ , कराची म्हणाला , मग आम्ही बोलत त्या दुकानाच्या बाहेर आलो , आम्हा ४ लोकांना बघून अरे आप साथ है ? कभी देखे नही म्हणाला , म्हंटलो अरे १० दिवसा करता आलोय, तर आग्रह केला त्याने , आओ खाना खाने , दमलो म्हणलो घरी जातोय जस्ट ऑफिसातून आलोय. चाय तो पिलो , अगदी प्रेमाचं आमंत्रण वजा हट्ट , समोर राहतो म्हणला , १५ मिनिट से क्या होगा ? बायको डॉक्टर आहे, ८ महिन्या आधी आलो छोटा गाव है म्हणाला , चला गप्पा मारू , चाय पिके खाना खाके जाईये म्हणाला . अरे चाय तो पिलो मस्त चहा करतो परत तोच आग्रह . मला खूप जेवायला जायचं आहे, दाल चावल खायला चालेल असं वाटलं , एक तर पाकिस्तानी जेवण एक नंबर असतं आणि इथे डायरेक्ट पाकिस्तानीच जेवण देणार , प्लस आठ दिवस नुसता पाव खातोय आणि इतकं प्रेमाचं निमंत्रण होतं आणि खरंच इतकं मना पासून कि काय सांगू ? पण एकदम चार लोकं नको वाटलं (खूप उपाशी आहोत भुक्कड सारखं खाल्लं असतं ).. जाताना परत शेक हॅन्ड , अगळी बारी जरूर आना , परत आग्रह वजा हट्टं. अरे काय असं झालं, आता ह्या वयात खोटा आव आणि खरं काय ते कळतं आपल्याला ...
कसं काय आणि का आपण मत बनवायचं सांगा?
सागर
No comments:
Post a Comment