स्पिती - हिमाचल ४ वाळवंट Himalayan Desert
आम्ही काल्पा सोडलं आणि स्पिती मध्ये शिरलो, आणि सगळं दृश्य बदललं , म्हणजे आधी सगळं छान होत, डोंगर डोंगर, माथ्यावर छोटास बर्फ आणि काल्पा सोडल्यावर एकदम रूक्ष डोंगर सगळं वाळवंट , हा भाग सगळा वाळवंट , मला हि आश्चर्य वाटलं. म्हणजे डोंगराच्या एका बाजूला सफरचंदाने लडबडले वृक्ष एकीकडे एकदम वाळवंट? सारंच अजब आहे. हे सगळे डोंगर वेगवेगळे आहेत रूप वेगळं, पण सारेच उंच उंच अति उंच तेच एक काय ते कॉमन आहे. एखाद दिवस बरं वाटतं पण नंतर सगळं उदास भकास. हे सगळं थंडीत फार छान दिसतात म्हणतात कारण सगळं पांढरं शुभ्र दिसतं. पण त्या वाळवंटात सुद्धा मी एक सुंदर तलाव पहिला. नाको नावाचं गाव होत आणि तिथे एक सुंदर तलाव आणि बाजूला हिरवी झाडं होती . एक लोकल बुद्धिस्ट मंदिर होतं , थोडं चढायचं होतं तिकडे , वर कुणीही नाही .. म्हणजे इतक्या दुर्गम स्थानी कोण असणारे म्हणा, पण निरव शांतता, वारा होता फक्त, छान वाटलं. खाली येऊन आम्ही तलाव पहिला काय सुंदर तलाव स्वछ पाणी छान झाडी होती .. इतक्या वर तलाव मस्त मस्त . शेजारी एका हॉटेलात जेवलो. एक माणूस आणि त्याचा परिवार होता बायको मुलं वैगेरे , एकदम हसरा छान जेवलो शाकाहारी होत, कढी बटाट्याची भाजी डाळ रोटी भात ...
मला एक प्रश्न सारखा सतावतोय ... हि लोक आहेत तरी कोण? राहतात तरी कशी? सात आठ महिने बर्फ एरवी वाळवंट तरी आनंदी हसरी ह्या लोकांचं मिळकतीचं साधन तरी काय? मिळकत नाही तरी हसरी माणसं का खूप काही मिळत नाही म्हणून जे मिळतंय त्यातच आनंद मानून हसरी असतात? पदोपदी हिमालय आपल्याला शिकवत असतो न बोलता आपण ते अनुभव करून शिकत जायचं असतं ...
आम्ही पून्हा गाडीत बसून निघालो, एकूण आठ दिवस आम्ही सकाळ निघायचो आणि रात्रौ येऊन झोपायचो , कलपा ला काय ते आम्ही छान निवांत राहिलो. वाटेत असेच खडतर रस्ते काही ठिकाणी रस्त्याचं काम सुरु आहे रस्ता अजून बरा करायचं BRO प्रयत्न करतंय , अफाट आणि फार मुश्किल आहे काम. इथेही काम करणारे बहुदा बिहारी आहेत आणि त्यात बायका खूप आहेत, टुरिस्ट गाड्या गेल्या कि ती कामगार लोकं आपल्याकडे बघतात आणि एकमेकात काहीतरी गम्मत सांगितल्या सारखी करतात आणि हसतात. नवल आहे, कष्ट करून घाम गाळून आनंदी, किव्हा कष्ट करून घाम गाळतात म्हणून आनंदी असतील.
आमचा पुढला प्रवास गुये नावाच्या गावाला होता, थोडा आडवाटेला आहे ते आणि वाटेत एक नदी लागते. तर त्या गुये चं महत्व असय कि तिथे एक ममी आहे (सगळंच अजब मी म्हणालो तुम्हाला). सांघा तेन्झीन असं त्या बुद्धिस्ट मॉंक च नाव आहे आणि ती साधारण ५०० वर्ष किव्हा जास्त जुनी आहे. तो ध्यानस्थ स्तिथीत बसला आहे. कुणी म्हणतं समाधी घेतली कुणी म्हणतं कि ध्यान धरलं असताना भूकंप झाला असेल किव्हा बर्फ पडला असेल आणि बर्फात राहिल्या मुळे दात केस आणि स्किन पण तशीच राहिली. ITBP म्हणजे इंडिया तिबेट बॉर्डर पोलीस ह्यांनी १९७० च्या दशकात एका भूकंपा नन्तर सगळं ठीक ठाक करताना , ती दिसली मग त्यांनी ती एका मॉनेस्ट्री जवळ एका जागेत बसवली. गावकरांचं म्हणणं आहे कि ती ममी गावाला संकटातून वाचवते. दात अजून शाबुत आहेत आणि नखं सुद्धा वाढतात असं लोक म्हणतात . मग ती चीन ने तिथून नेण्याचा प्रयत्न केला वैगरे वगैरे गोष्टी आहेत . चीन म्हणजे तिबेट, अगदीच हाकेच्या अंतरावर आहे, तिथे नेटवर्क नाहीये फक्त लागला तर जिओ लागतो. पण एक फार आश्चर्याची गोष्ट म्हणजे नेटवर्क नसताना माझा मोबाईल बेजिंग ची वेळ दाखवू लागला. आणि ज्यांचा आय फोन आहे त्यांच्या बरोबरच झालं , अँड्रॉइड ला काही प्रॉब्लेम नाही आला. हि लोक बंद असलेल्या मोबाईल ची वेळ बदलू शकतात तर चालू मोबाईल च काय आणि कंप्युटर चं काय करतील सांगता येत नाही?
तिथे ती मोनास्टरी चं काही नूतनी करण सुरु आहे , त्यात एक माणूस बुद्धाची मूर्ती रंगवतना गात होता , आवाज थोडा घुमत पण होता, पण इतका अप्रतिम गात होता कि मी त्याची रंग कला सोडून त्याची गायन कलेंनीच प्रभावित झालो, त्याच्या कडून गाणं गाऊन घेतलं रेकॉर्ड हि केलं, लाजला बिचारा पॅन्ट पण फाटकी होती पण चेहरा प्रसन्न आणि आवाज पहाडी देव कुठे कुठे पेरून ठेवतो कुणास ठाऊक ? मी माझ्या इन्स्टा वर टाकलं पण माझे जेमेतेम ८० फॉलोवर्स कुणी परत शेर केलं तर त्या माणसाचं आयुष्य बनेल पण आपण हिमालयात थोडी राहतो लोकांचा विचार करायला ?
गाव छोटं टुमदार ५० ते ६० वस्ती तरी तिथे पोस्ट ऑफिस आहे बस येते, टाबो नावाच्या एका मोठ्या गावा पासून ४० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि सिमला पासून ४०० किलोमीटर... एक लक्षात घ्या तिथे थंडीत तापमान -२० च्या खाली जातं दिवसा सुद्धा -४ असतं आणि जवळचं गाव जिथे १२० घरं ... काय करत असतील इमरजन्सीत? का त्यांना इमरजन्सी नसतेच? का आपण बाऊ करतो? सगळंच अजब सगळंच खूप साधं सरळ . असं म्हणतात कि The most simple questions are the most profound. तू कोण आहेस त्यातलाच एक सवाल, हि लोक आहेत तरी कोण?
आम्ही तिथून निघालो आणि टाबो नावाच्या गावी आलो. मला फार आवडलं ते गाव, चहुबाजूनी डोंगर (उंचच उंच खूप उंच) आणि थोडीशीच घर पण जवळ जवळ, डिश अँटेनाहोत्या घरावर (म्हणजे हि लोक पण त्या अति भयंकर सिरिअल्स बघत असणार, काय रे देवा ), आमचं हॉटेल पण छान होतं. मी वर गच्चीत गेलो म्हणजे एक मजली बिल्डिंग वर ओपन असं टेरेस टाईप. समोर एक डोंगर होता तो ह्या बुद्धिस्ट मॉंक नि पोखरून त्यात गुहा केली होती आणि ती लोकं आत जाताना दिसले. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लोक सरळ उतरलेत म्हणजे हातात काही दोरी नाही जवळ जवळ सरळ डोंगर पण वेडे वाकडे उतरत सरळ खाली येत होते. मला चार पावलं टाकलं कि धाप लागत होती आणि हि लोकं दररोज एवढा मोठा डोंगर वर खाली करत होते . हि मॉंक लोक ना दिसला डोंगर कि पोखरा आणि करा गुहा अशी आहेत , आमच्या बोरिवलीला पण कान्हेरी गुंफा आहेत, पण ते ठीके जंगल आहे जवळ समुद्र, नदी खायला प्यायला सगळं मिळत असणारे पण इथे हिमालयन वाळवंटात का म्हणून हि लोक राहत असतील आणि आता तरी आपण कपडे स्वेटर घालू शकतो पण त्या काळी असं काही नसणारे मग का बरं हे असं करत असतील? मी काय तिबेट नाही पाहिलं पण असच असू शकेल. इतक्या दुर्गम आणि कठीण जागेत का बरं वस्ती करायची ... (हल्ली लोक सिंहासनावर बसून ac हॉल मध्ये लोकांना ध्यान धरायला शिकवतात, चांगलंय) ... मी म्हंटल ना हिमालय खुप शिकवतो शिक्षक आपण निवडायचा .
टाबो प्रसिद्ध आहे एका monastry साठी प्रसिद्ध आहे ती सर्वात जुनी आणि सगळ्यात पवित्र आहे असं म्हणतात. आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन तिथे फोटो काढले, लहान लहान लामा तिथे शिकत होते आणि फार कपडे न्हवते घातले. हि परंपरा अशीच पुढे नेण्या साठी धड्पड. त्या तिथे दुकानात मी चार गोष्टी घेतल्या माझ्या कडून त्या टाबो वासियांना मदत ... माणसं तिथे हसरी हो आणि हो एक शाळा सुद्धा होती तिथे.
No comments:
Post a Comment