Saturday, November 17, 2018

अमेरिका -2

आज शुक्रवार .... 

ऑफिसात आज थँक्स गिविंग साठी सगळ्यांनी घरून काहीतरी आणलं होत नेहमी सारखं एक इशू आला आणि मला जरा जास्त थांबावं लागलं ..... म्हणजे सहा , बाकीची लोक साडे चार पाचला गेली. एक अमेरिकन मुला बरोबर मी एक त्याला आलेला प्रॉब्लेम सोडवत होतो आणि मला उशीर झाला.

 सगळी तरुण मुलं सारखीच असतात (आणि मुली सुद्धा) नचिकेत  (माझा भाचा वय २२)पेक्षा  एखाद दोन  वर्ष मोठा असेल पण साडे सहा फूट आडदांड. इथे सगळेच तगडे आणि जिम धारी , बर वाटत बघायला आपल्या कडे अभ्यासालाच इतकं महत्व आहे कि माने खाली काही असत हे आपण विसरतो, खरंच विसरतो ;).. ... 

निघताना मी अमेरिकेत काम करणाऱ्या श्रीरंग ला विचारलं कि अरे इथे दारू मिळते का? त्याने लगेच मॅप काढला आणि सांगायला लागला कि abc मध्ये मिळेल (abc ची गंमत नंतर ) तर ज्या मुलाला मी मदत केली त्याने हे abc ऐकलं आणि म्हणाला अरे वाह abc मजाय ,  लगेच संधी साधू पणा करत म्हंटल , नेतोस का?

त्याचा प्रॉब्लेम त्याच्या मते मी सोडवला कारण त्याला काही कळत न्हवत आणि त्याला वाटलं मी उपकार केलेत म्हणून म्हणाला असेल,  "अरे नक्की जवळ आहे दहा मिंट". 

चला म्हणाला , मला वाटलं मला दहा वाजतील तुम्ही (इंग्रजीत सगळ्यांना तुम्ही म्हणतात you  म्हणजे तुम्ही , कळलं ?)सहालाच मोकळं केलंत चला ... त्याच्या मापाचा एक truck मध्ये मला तो घेऊन गेला  आणि आणि बसायच्या आधी डबीतून तंबाकू चा बकाणा दातांच्या आणि ओठांच्या मध्ये कोंबला आणि मग आपल्या कडचे लोक तोंडाचा चंबू करून बोलतात तसा सगळा रास्ता बोलला , फक्त थुंकला नाही कारण त्याने एक बाटली घेतली आणि त्यात थुकला .... मला डॅनी जी जाम आठवण आली , त्याने मला एकदा सोडल होत पुण्यात असताना  तेव्हा ऑफिसातून एक ग्लास आणला होता आणि त्यात थुंकला , पण एके ठिकणी शेवटी थुंकलाच लांब थांबून कडेला पण ह्या मुलाने शेवट पर्यंत बाटली बाळगली. 

मला म्हणाला माझी गर्ल फ्रेंड (आपण फार बाऊ करतो बाबा ) चिडेल तिने मला पाहिलं तर, मी पण एकदम साळसूद पणाचा आव  आणून का रे? अस म्हंटल (ऊगाच त्रास होत नाही मला, कुचकट आहे मी , देव बघतोय ) अरे तंबाकू आहे ... मी अरे हो? असं केलं (देवा माफ कर , पण मला हा दारू पर्यंत नेणार होता ), आमच्या कडे पण मिळत , मी घेऊन जाईन म्हंटल मला दोन माणस माहित आहेत (बिनाताई जाम चिडेल ) त्यांना देतो , घेघे म्हणाला स्वस्त आहे , बरं पडत. 

तो स्वतः अमेरिकन फ़ुटबाँल खेळायचा (ऑसुदी खेळ , नुसती आदळ आपट हाणा मारी ), पण पोरगा अगदी तसाच .... वर्ष भरा पूर्वी आला कारण त्याचा गर्ल फ्रेंड ला ह्या इथे नोकरी मिळाली , आधी ती  पास झाली मग हा , पण एवढा आडदांड पोरगा गर्ल फ्रेंड साठी इथे (नॉर्थ कॅरोलिनाला ) , आपण उगाच बाऊ करतो आणि लपवतो (मी मगाशी सांगितलंय , पण तरी ). 

abc 

तर इथे केरळ सारखी फक्त सरकार दारू विकते आणि दुकान ठरलेली , त्या मुळे यूरोप सारखं (मला खूप आवडत म्हणा ) सगळी कडे नाही . पण आपल्या सारखं प्रत्येक राज्य वेगळं,  नियम वेगळे . मी दुकानात गेलो दारू घेतली (जीवात जीव आला ) आणि ती पण टीचर्स , (मजा करा लेको मटार उसळ शिकरण) आणि लाईनीत उभा राहून पैसे (डॉलर्स, पण भारता पेक्षा स्वस्त पडली  ) दिलें . इथे ड्राय काउंटी आहेत दारू वर्ज पण तिथे चोरून दारू विकणे वगैरे आहे . आपण खूप सेम आहोत तरी वेगळे म्हणून म्हणतो आपण त्यांची कॉपी करू नये ... ह्यांच्या एका स्टेट मध्ये अख्खं यूरोप येईल.... 

1 comment:

Unknown said...

मस्त लिहिलंय सागर , गप्पा मारल्या सारखं 👌👌👌👌