Sunday, May 31, 2015

मुनिक - जर्मनी - 1

मुनिक - जर्मनी

माझी ही उरोप ची तिसरी फेरी असल्यामुळे मला इथला विमानतळ, स्वच्छता वगेरे  बद्दल काही नाविन्य न्हवत , तसा  आता मुंबईचा नवीन T2 पण छान आहे. मला थक्क केल ते जर्मन लोकांच्या efficiency ने , मी बरोबर दहा मिनटात माझ सामान गोळा करून immigration आटपून बाहेर होतो त्यातली पाच मिंट मी विमानतळ न्याहाळत होतो म्हणून गेली.  हा  तर खूप मोठा विमानतळ आहे, कितेक देशांची विमान इथे येत असतील, पण इतक सुंदर नियोजन कि कुठे थांबाव लागत नाही. पाच पन्नास ला माझं विमान उतरल आणि मी सात वाजून दहा मिन्ताने दुकानातून दुध अंडी वगेरे घेऊन सात दहा ला ३० एक किलोमीटर लांबच्या हॉटेलात हजर होतो.  

पण मला ही  लोक फारच efficient असल्याचा पहिला झटका हॉटेलात मिळाला, खोली  ३ च्या आधी मिळणार नाही अस  म्हणाला तो उंच धिप्पाड माणूस  आणी एवढ्या भल्या मोठ्या माणसाशी मी काय वाद घालणार? त्याला  म्हंटल दे कि एखादी खोली लेका सामान टाकतो माझ. नाही म्हणाला साफ करणारा माणूस (कि बाई) दहा ला येणार म्हंटल करू काय मी ? बसू का इथे हो बस म्हणाला, माझ्या नशिबाने माझ्या आधी इथे एका वर्षा साठी पाटील नावाचे सद्गृहस्त आले आहेत ते म्हणाले  तुम्ही या माझ्या कडे, नशीब माझ म्हणून वाचलो नाहीतर चार तास तिथेच खितपत पडावा लागल असत मला.

इथली मोठी गम्मत म्हणजे ट्याक्स्या सगळ्या mercedes benz चाईला एकदम रैसि , मी पाकीडली ती पण बेन्झ आणि बाई चालक, वयस्कर होती (बाई).  नीट सोडलं मला .  इथे ट्याक्सि वाले सुधा सिग्नल पाळतात झेब्रा क्रोसिंग च्या आधी थांबतात, इथे खर तर अस झेब्रा क्रोसिंग नाहीये एक रेष आखली आहे आणि लोक थांबतात.