इचूका - प्रवास
मी राहतो ते गाव लहान आहे आणि इथून सगळंच लांब आहे त्या मुळे आम्हाला ६०० किलोमीटर प्रवास करणं भाग होतं. छान रस्ते नो खड्डे , सगळीकडे रस्त्यात पांढरे पट्टे , कुठून ओव्हरटेक करा कुठे नाही, हे सगळं अगदी नीट आखलं होतं हॉर्न नाही कुणी अंगावर नाही ... असं स्वप्नमय सगळं (हे सगळं mandatory आहे, आपण आपली अपेक्षा इतकी ० केलीये कि बेसिक पण भारी वाटतं).
तर प्रवास उत्तम झाला ७ तास लागले (३ वेळा थांबून). इथे ११० अशी max लिमिट आहे मध्ये ८० होतं गाव आलं कि ५० मग २ किलोमीटर ४० . आता बघा हा, रस्ता मोकळा वाटेत कुणी नाही शुकशुकाट एक बोर्ड गावातला कि ५० स्पीड , गाडी उत्तम , पटकन लक्षात नाही येत ५० चा ६० कधी होतो ते स्पीड. आम्हाला असाच एक जबर फटका बसला, आम्ही तिघे होतो तंद्रीत चाललो होतो, पुढचा एकदम स्लो झाला म्हणून आम्ही झालो, तो वळला एके ठिकाणी आणि आम्ही पुढे गेलो , २ मिनिटाने पाठी पोलीस ची गाडी विंग वोंग विंग वॉंग करत पाठी , इंग्रजी पिक्चर मध्ये दाखवतात तशी थांबली खूप पाठी (भारी BMW होती), अमेरिकेत तुम्ही हलायचं पण नसतं समोर बघत राहायचं , पोलीस येऊन काय ते बघून जाऊदेत त्यातला प्रकार. इथे काहीच हालचाल नाही म्हणून आमच्यातला गाडी चालवणारा उतरून गेला, आम्ही जायचं का ते कळत न्हवतं , मग लायसन बघू झालं, ते जपान चं होतं त्यात दहा मिंट .... मग तो सडे आठ फूट पोलीस पाटील आला आणि म्हणाला कि तुम्ही जोरात गेलात , ५० लिमिट आहे साहेब ... ३६००० रुपये दंड मारलान ...परत वाचा (वाचाल तर वाचाल). मला सांगा नियम न पळून सांगताय कुणाला? मग आम्ही आखा रस्ता ५० दिसलं कि ३० नि गेलो आणि ११० दिसलं कि ९०. कडक अनुशासन कडक शिस्त ... आम्हाला एक दोनदा लोकांनी हॉर्न पण मारला , जल्दी जाव म्हणून सांगायला , त्याला आम्ही (गाडीतून बंद काचेतून ), बरी नजर वाले तेरेको ६०००० का दंड हो म्हणून ओरडलो (हिंदीत). आपलं समाधान.
एवढं सिलो सिलो जाऊन पण आम्ही बरे गेलो , वाटेत एकदा पेट्रोल पम्पावर उतरलो तर लै माश्या , गाडीतून उतरल्यावर, आत चहा ब्रेड वगैरे विकतात , गुजराती होता, in the middle of nowhere होता पंप , तरी हा होता , धड इंग्रजी पण येत न्हवतं , बायको फर्डा इंग्रजी होती, माश्या सोडणार नाही म्हंटली पाठ. इथे किडे माकोडे खूप आहेत , रानटी आहे प्रदेश म्हणून लोकं पण तशीच आहेत धिप्पाड ...
इचूका गाव छान आहे , बंदर आहे आणि new south wales आणि Victoria च्या बॉर्डर वर आहे आम्ही एक बोटीतून चक्कर पण मारली सकाळी. मरे नदी आहे, नदी आहे म्हणून हिरवळ आहे. मला पाणी फार आवडतं . नावा मुळे असेल माझ्या, पण नदी वगैरे म्हंटलं कि मला बरं वाटतं , कोकण पण मला म्ह्णून जास्त आवडत असेल. तर इथे नदी आहे त्या मुळे छान झाडं वगैरे दिसली , बरं इंडियन जेवण मिळालं (काय लोकांना कौतिक).मुख्य म्हणजे कांगारू दिसले, खूप जिवंत उड्या मारणारे कांगारू दिसले, आईच्या पोटातून लहानगा डोकावून पण बघत होता (मी कांगारू खायचा प्लॅन त्या मुळे ड्रॉप केलाय) गोड दिसतात. एका रिसॉर्ट जवळ दिसलेत. ऊन्ह उतरली कि येतात बाहेर . माणसाला बघून पळून जातात. ह्या लोकांना थोडा उपद्रव होतो म्हणतात. पण एकदाचे दिसले बाबा कांगारू .
येताना पण तितकेच तास लागले (दंड नाही लागला), पेट्रोल पंपावर जेवलो, दोन गुजराती लोकं दिसली , पण एकूण प्रवास सुखकर झाला.
आम्ही एकदा ऑरेन्ज नावाच्या ठिकाणी जाऊन आलो तेव्हा रस्ता छान होता, हिरवं शेत दिसलं , थोडा वर खाली रस्ता होता, वर खाली म्हणजे चढ उत्तर रस्ता एकदम टकाटक मक्खन. हिरवळ पण होती खूप. गाव मोठं होतं पण बाकी सगळं सेम. काही फोटो पण टाकतोय. ऑरेंज मध्ये इंडियन स्टोर आहे आणि एक दोन पंजाबी हॉटेल पण आहेत . सुख वस्तू आहे गाव . एक छोटा मॉल पण आहे.
मला US ला किव्हा यूरोपात खूप ठिकाणी homeless लोकं दिसली. US ला जवळ जवळ प्रत्येक स्टेट मध्ये (१० का ११ स्टेट्स फिरलोय) दिसलेत. इथे मी अजून २ का ३ लहान शहर पाहिलीत पण अजून फार गरीब किव्हा homeless नाही दिसलीत. कष्ट करी कामगार वर्ग सारखा दिसतो . मी ज्या शहर वजा गावात राहतो तिथे सोन्याच्या खाणी आहेत (सोनं स्वस्त मिळेल का ? असं विचारल्यावर भारीच विनोदी आहेस बुवा, असं म्हणाली ती ताई आणि ठो ठो हसली) म्हणून कामगार वर्ग दिसतो आणि दुसरं म्हणजे शेती करतात लोकं , एकर नाही तर किलोमीटर नि करतात २५ किलोमीटर वगैरे. एवढी शेती करायची म्हणजे मोठे ट्रॅक्टर आलेत , माणसं नाहीत फार. तोच माणूस सगळं करतो म्हणून कष्टकरी कामकरी वर्ग. आपल्या कडे फार चाकर मानी दिसतात लोकं जीव टाकून लोकांना पैसे कमावून द्यायच्या मागे लागत असतात. इथे ते नाही काही . निवांत असतं स्वतः कष्ट करा स्वतः खा.अजून एक म्हणजे कपडे साधे आहेत , ऑफिसात तर चड्डी घालून येतात आमच्या , उन्हाळा आहे म्हणून असेल . म्हणजे CFO पण चड्डीत COO तेच (वऱ्हाड निघालंय मध्ये नाही का ती बाई म्हणते चड्डी चड्डी काय करता घेतल्या चड्ड्या, तसंच काहीसं). आपल्याकडे बायका जरा नटून वैगेरे येतात तसं नाहीये इथे, एकूणच बाहेरच्या देशात असं मला जाणवलं. पुरुष नशिबाने अजून तरी सगळीकडे usually सेम असतात , त्या मुळे दाढी वेगैरे आपल्या सारखं आहे इथे.
(पण ते चड्डी म्हणजे जरा जास्तच झालं) .
बाकी बरंय गाव माणसं बरीयेट फार श्रीमंत नाही कि गरीब नाही. एक आवर्जून सांगायचं म्हणजे मी जिथे जातो तिथे चार पाच लोकं बसतात (५० लोकं आरामात मावतील इतकी जागा) बाकी वेरहाऊस किव्हा साईट वर असतात. मालकीण बाईच सकाळी ७ ला ऑफिस उघडते, जाऊन पाणी आणते चहा (tea bags ) दूध आणते , कचरा बाहेर टाकते (dust bin मध्ये ) ७ नंतर तीच कुलूप लावून जाते. त्या दिवशी त्या मालकाने ऑफिस मॉप ने पुसून घेतलं आणि ते बाहेर वाळत टाकलं सगळं घबाड. बऱ्यापैकी पैसे आहेत त्यांच्याकडे. पण कसला माज नाही आणि हे काम मी का करू? असं नाही. शेतकरी होता आधी पण साधे पणा अजून टिकून आहे. (त्याच्या पंज्यात शेक हॅन्ड म्हणजे बादलीत चमचा असं आहे एकदम कष्टाचे हात कळतात). हा एक फरक आपल्यात आणि ह्यांच्यात आहे. म्हणजे अगदी यूरोप आणि अमेरिकेत पण कोणत्याही कामाला कमी नाही लेखत आपण हे कसं करायचं? हे नाही.
असं grounding experience आले कि खूप बरं वाटतं.
इथे एक मोठी डिश आहे, म्हणजे दुर्बीण आहे, observatory , छान होता अनुभव एक "The Dish" नावाचा चित्रपट पण येऊन गेलाय. कधी लिहेन त्यावर. आता उल्लेख केला कारण तिथे एक पिक्चर बघितला. सूर्या पेक्षा कैक लाख पटीने मोठे तारे आहेत आणि सूर्याचा एक कण जरी चंद्रावर पडला तरी संपेल चन्द्र हा सूर्याचा आकार. म्हणजे त्या ताऱ्याचा अजस्त्र पणा बघा ... आपण कित्ती क्षुल्लक आहोत ते जाणवेल . म्हणून त्या माणसाचं मला फार कौतुक वाटलं, ह्या जगात आपली जागा ओळखून राहणारी माणसं फार कमी आहेत. आणि अंतराळात पाहिलंत तर आपलयाला हे फार लक्षात येतं कि आपण काही नाही रे कसला माज आणि कसलं काय.
इथे फार सुंदर आणि मोठं दिसतं आकाश आणि जमीन, त्या मुळे फार जाणवत राहतं आपला छोटेपणा (लहान म्हणूया)
चला मंडळी असाच फिरत राहिलो तर लिहीत राहेनच, तुम्ही पण येऊन बघा एकदा , छान आहे देश.
सागर कुलकर्णी
फेब्रुवारी २०२६
No comments:
Post a Comment