आधी सांगीतल्या प्रमाणे आम्ही तो डेंजर रस्ता चढून वर आलो (पुढला प्रवास बहुतेक अश्याच रस्त्यात होणार होता ) तर मधेच एक गाव लागला चिटुकलं पण हे चिटकूल न्हवत कारण चिटकूल अजिबात चिटकू पिटकू नाहीये. ह्या चिटकूल च एक वैशिष्ठ म्हणजे तिबेट च्या आधीचं हे शेवटचं गाव आणि शेवटचं पोस्ट हाफिस. इथे हिमाचल खुपसा भाग तिबेट च्या बॉर्डरला आहे त्या मुले भारतीय सैन्य आणि BSF ची खूप सैनिक दिसतात. म्हणजे आम्ही त्या चिंचोळ्या रस्त्याने वर येताना समोरून अनके ट्र्क आले मग आम्ही गाडी रिव्हर्स घेऊन कडेला उभं राहून त्यांना जागा करून दिली. हे गाडी रिव्हर्स घेऊन कडेला उभं इतकं सोपं नसतं (आमच्या लहान पणी बिल्डिंग ला भिंत असायची आणि मग आम्ही एका बिल्डिंग मधून दुसया बिल्डिंग ला जाताना भिंत चढून जायचो, साधं सरळ गेट मधून नाहीच आणि बरेचदा शॉट कट म्हणून जायचो, तर त्या भिंतीवरून आम्ही चालायचो, एक वीट भर भिंत त्या वर जेमतेम एक पाऊल राहील असं, पण समोरून कुणी आलं कि मग ज्या कवायती कराव्या लागायच्या तशी कवायत हि लोक मोठ्या गाड्या घेऊन करतात) हे उधाण मुलांना नक्की कळेल
मी इतकं लहान पणीचं उद्धरण दिलं . कारण असय ना, तिथे गेलं कि आपो आप आपण कॅलेंडर मागे नेतो कारण ती लोकं अजून जुन्या सारखंच आयुष्य जगतात , उगाच हसतात (?) आनंदी असतात, प्रामाणिक म्हणजे प्रामाणिक , प्रामाणिक एकदमच प्रामाणिक
उदहारण ....
आम्ही गाडी लावली एका टेकडीवर आणि उतरून दऱ्या पाहायला जात होतो आणि मला आठवलं माझं पाकीट असलेला बटवा का बॅग तिथेच गाडीतहोती , मी म्हंटल जरा गाडी उघड किमान पाकीट तरी घेतो, तर ड्राइव्हर म्हणाला कि खूप पैसे जरी तू गाडीत ठेवलेस आणि गाडी उघडी ठेवलीस तरी सुद्धा कुणी आत अजिबात पैसे घेणार नाही हि लोक संतुष्ट आहेत. (कारण त्यांच्या कडे खूप मौल्यवान असा फक्त निसर्ग आहे आणि अजून तरी आपल्यात तो निसर्ग हिरावून घ्यायची क्षमता नाहीये, अजून तरी ) हे मी मनात म्हणालो. थोडं विषयांतर होतंय पण ना लाज वाटते आपलीच. असो .. इथे क्राईम रेट सगळ्यात कमी (कमी नसायला काय? इथे बुटाची लेस लावताना धाप लागते चोर धावणार कसा? अन कुठे?)
तर वर जाताना एक पठार लागला म्हणजे गावं लकछम होतं नावं गावाचं ते लागलं. तिथे शेती करतात लोक, फूल दिसतात पण त्याला म्हणतात उगला म्हणजे आपला गहू (आपले तांदूळ खरं तर), पण हे दळून ह्याचा दीरढ करतात म्हणजे मराठीत डोसा. तिथून खूप वर गेल्यावर बसपा नदी च्या किनारी आमचे टेन्ट्स होत्या . काही गोष्टींचं वर्णन करायला शब्द तीठे पडतात (एक तर माझा शब्द भांडार सीमित आणि हा निसर्ग अफाट अद्भुत , ह्याला शब्दात का आणि कशाला बांधायचं. (सगळंच का बांधायचं? काहीही का बांधायचं). भारतात का जगात माहित नाही पण इथली हवा सगळ्यात शुद्ध आहे असं रिसर्च मधून समजलं https://www.sagarkulkarni.in/ इथे मी थोडेसे फोटो टाकले आहेत, जमलं तुम्हाला तर शब्दात बांधायचा प्रयत्न करा , माझ्या कुवतीच्या पलीकडलं आहे .
हा कॅम्प ना बास्पा नदीच्या किनारी आहे (आठ महिने बंद) आणि काय तो निसर्ग अनेक अनेक डोंगर डोंगरा मागून डोंगर आणि मध्येच एका डोंगराच्या शिखरा वर मुकुटा सारखा बर्फ अद्वितीय काय निसर्ग काय ते दृश्य पाषाणा ला पाझर फुटेल ... हि ,माणसं इतकी निरागस साधी का ? ते मला समजलं रोज उठून तुम्हाला हे दृश्य दिसलं तर ? परत झोपताना आकाश हळू हळू रंग बदलतं हवा आणिक थंड, माहोल सर्द होतो आणि इतकं सगळं सुंदर असतं कि तोच मोठा नशा होतो .. अहाहाहाहा.
खरं सांगतो त्या टेन्ट मध्ये रात्री आपण गारठतो , सगळं शांत आणि नदीचा हलका आवाज ... मला पाण्याचं व्यसन आहे आणि नद्यांच्या पाण्याचं अधिक, मालवण ला मी नदी किनारी राहायला पसंद करतो, पण पाणी. मला पाणी खूप आवडतं आणि इथे तर मी जेम ते, वीस ते तीस फूट पाण्याच्या जवळ होतो, पाण्यात पाय ठेवला तरी गारठतो, पण नितळ, शुद्ध पाणी पाहण्यात वेगळी मौज असते .. हा मंद आवाज ऐकताना कधी झोप लागली ते समजलं नाही आणि सकाळी बाहेर पडलो तेव्हा अद्भुत ...
तिथे जी मुलं होती त्या टेन्ट ची काळजी घेणारी ती उशिरा उठली मग आम्हीच चार लोकांनी मिळून चहा केला , सडे आठ नऊ ला चहा नाश्ता मिळाला पण चहा तर सकाळीच लागतो ना? अमृतुल्य आहे इतक्या सुंदर ठिकाणी चहा नको? बाकी मी काय वर्णन करू? सुंदर नदी , डोंगर. मधेच एखादा पंधरा शुभ्र कलशा सारखा एखादा डोंगर माथा. आमच्या अवती भवती फिरणारा तो गोंडस कुत्रा ... (एक जाणवलं जिथे माणूस तिथे कुत्रा अख्या देव भूमीत म्हणाल तिथे असाल तिथे एखाद दिसतच. ). जाऊन या, रमणीय आणि प्रेक्षणीय आहे.
चिटकूळ ला एक शाळा आहे (हो हो आहे ). मला दोन लहान मूल दिसली, (तुम्हाला सांगतो शाळेत जाणारी मूळ आणि मुली ह्या पेक्षा दुसरं प्रेक्षणीय दृश्य नाही ) एक मेकांच्या हातावर काही तरी काढत होती, चारच महिने शाळा किती मस्त पण बाकी सगळा बर्फ , माझ्या समजण्या पलीकडलं आहे . असो , तर ह्यांच्या कडे धन्य कोठार आहेत, आठ महिन्याची शिदोरी असते ह्यात, आमचा ड्राइवर अरविंद म्हणाला कि ह्यांच्या कडे किमान डेड वर्ष पुरेल इतकं धान्य असत, पैसा अडका नसेल पण , धान्य आणि पाणी असतं पाणी म्हणजे सगळाच बर्फ. किती बेसिक धरून आहेत हि लोकं .. ना? बकरा कापून तो उन्हात सुकवतात , उन्ह खूप तीक्ष्ण असतं (अगदी सूर्या च्या जवळ न हो?) मग बकरा चांगला सुकतो मग तो खायचा हिवाळ्यात , खाली खूप डेलिकेसि म्हणून खपते... इथे मिनरल वॉटर फुकट डायरेक्ट हिमालयातून हो, परत २००० हजाराची डेलिकेसि रोज ताटात , हवाय कशाला हो वैभव?
एक देऊळ आहहे तिथे सुंदर नक्षी काम केललं पण लाकडी कारण बर्फात काही नाही टिकणार, फोटो मध्ये पहा कित्ती सुंदर आहे, सकाळी एक तास भर असत उघडं बाकी बंद. तिथे एक आंधळा माणूस आणि त्याची बायको आले होते देवाच्या पाया पडायला, आम्ही त्यांना झुले असं केलं (म्हणजे नमस्कार असेल ). पण सांगयचं असं कि ती दोघे इतके हसरे होते, देवाच्या पाया पडले आणि गेले, म्हणेज आंधळा माणूस तसं पाहिलं तर दारिद्य आठ महिने बर्फ बर्फ अगदी -२१ वगैरे असेल पण जोडपं हसरं ... माझे वडील म्हणतात तसं और क्या चाहिये :) . सुख आपल्या मानण्यावर आहे ...
शब्द खूप दगा द्यायला लागलेत ...
जाऊन या , पुढे काल्पा आणि बाकीची स्पिती फिरवतो ....