Thursday, February 4, 2016

मुनिक - जर्मनी - 5

मुनिक - जर्मनी - ५

Munich day tour  small and  big  अश्या दोन टूर्स असतात इथे , म्हणजे   अश्या अनेक आहेत, पाई आहेत, काही specific आहेत आणि बाकी आपल्या normal मुंबई दर्शन असते तशी. small आणी  big अश्या होत्या म्हणजे एक बस तुम्हाला शहरात फिरवते हव उतरा  दर अर्ध्या तासाला एक बस  सोडा आणी ती पकडा अस  काहीतरी, पण अख्या युरोपात आहे हाच फंडा . मी ती लांब पल्याची  एक बस केली आधी एक प्यालेस पहिला (नुसता उच्छाद मांडलाय ह्या महालांनी), खूप आहेत इथे शहराच्या आत पण, त्यांचा एक वेडसर राजा होता (त्यात  नवल ते काय?)  , त्याने सगळी संपत्ती अश्याच  महालात उधळली , छान  आहे  म्हणा,  बाग वगेरे पण सुरेख, पण गड आणि महालात फरक असतो न? (म्हणून  महाराष्ट्रात उजाड आणि दुर्लक्षित  पडलेले गड आणि राजस्थानात महालात वसलेले पंचतारांकित  hotels) तसा मी एक महाल पहिला आणी मग लांब च्या बस मध्ये   बसलो , म्हणेज big टूर  वाल्या. ती बस तुम्हाला BMW museum, Olympic stadium आणी Alianz arena  मध्ये नेते. ही ठीकाण गावा बाहेर आहेत  त्या मुळे एक अर्धा तास लागतो. एक सांगायचं म्हणजे हे सगळ वैभव WWII मध्ये नेस्तनाभूत झाल होत, ह्या जर्मन लोकांनी हे सगळ पुन्हा बांधून काढल, म्हणजे साठ  वर्ष्यात सगळ उभारलं.



पहिला पल्ला BMW museum,  तीथे  अनेक गाड्या ठेवल्या आहेत सगळ्या BMW  आणी दोन Rolls Royce, शेवटी त्या दोन Rolls Royce गाड्याच सगळ्या बाकीच्या गाड्यांना  खाउन टाकतात . तुम्हाला हव्या त्या गाडी मध्ये बसू देतात (Rolls Royce मध्ये सोडून). मी हौस भागून घेतली तीच हौस भागवायला मी Mercedes Benz च्या एका मोठ्या शो रूम कम  museum मध्ये जाउन तिथे पण  बसून आलो. जवळ पास ५०० गाड्या होत्या, बहुतेक सगळ्या गाड्यान मध्ये बसू देतात. फोटो काढायला कुठेच बंदी नाही, फक्त फ्ल्याश लाईट मज्जाव आणी काही ठिकाणी video  shooting करू नका ही विनंती करतात, पण येउन बघत सुद्धा नाहीत, विश्वास खूप ठेवतात ते  मला एकूणच युरोप मध्ये जाणवल आणी अवडल सुद्धा. तीथे आत एक दुकान पण आहे, छोट्या गाड्या ,T Shirts    वगेरे आहेत पण BMW गाडीला साजेश्या किमतीत आहेत ह्या वस्तू , त्या सुद्धा  नुसत्या बघून मी बाहेर आलो, समोरच Olympic stadium आहे, अजून सुस्थितीत आहे ते लोकांना वापरायला ठेवल आहे ते आता, आत सुंदर तलाव आहे , फिरायला खूप मोकळी जागा आणी मधेच एक उंच tower आहे, त्याच तिकीट काढायचं आणी त्याच्या वरच्या मजल्या वरून सगळ मुनिक दिसत , ठीक आहे , म्हणजे ऐफेल टावर वरून जर तुम्ही प्यारीस पाहिलं असेल तर मग बाकी सगळ ठीकच  वाटत . तिथे बागा आहेत खूप आणि फिरायला खूप जागा आहे, स्वीमिंग पूल आहे. ती घर जी त्या वेळेला त्या खेळाडून साठी बांधली होती तिथे आता लोक राहतात. तिथून ती बस जाते अलायन्झ अरेना मला पाटील  म्हणाले होतेच की आवर्जून बघा आणी भाचा माझा , म्हणून मी  म्हणल  जाउन येऊ, तर तिथे आत गेल्यावर समजल कि  त्यांची एक टूर असते (12 का 15 युरो  घेऊन )   पाऊण तासाची , पण माझी बस जी होती ती अर्ध्या तासाने होती, तिथे एक खडूस माणूस  होता म्हंटल मधून जाता    येईल का? नाही म्हणाला,  तिकीट   काउनटर वर  माणूस माझ्या कडे बघत होता, मला म्हणाला काय झाल ? माझी व्यथा सांगितली, सोप आहे म्हणाला इथून 500 मीटर वर  एक स्टेशन आहे  सोडा बस,  शेवटची आहे  ती मी म्हणालो ,  अस पण ती तुम्हाला परत नेणार  शहरात हे बघून घ्या इतक्या लांबून  आला आहात तर, अस म्हणाला . माझ्या कडे  असहि ट्रेन च डे  तिकीट होतच, तो म्हणाला चालेल हे, तुम्हाला थेट तुमच्या स्टेशन ला सोडेल, नाहीतरी बस काय तुम्हाला मधेच सोडणार तिथून ट्रेन करूनच जाणार,   देऊ का तिकीट? आणी  मस्त हसला . पण खर सांगतो मी ती टूर घेऊन खूप best काम केल . जी  माहिती मला मिळाली त्या वरून अनेक गोष्टी मला समजल्या, म्हणजे एकूण जर्मन माणसा बद्दल, खेळा बद्दल , एकूणच. मी काय फार फूटबॉल  fan नाहीये, म्हणजे  आवडतो पण वेड   नाहीये, पाहिलं प्रेम क्रिकेट.  पण त्या दिवशी फुटबॉल बद्दल खूप कळल आणी   क्रिकेट पेक्षा तो खेळ किती  मोठा  आहे  ते पण समजल.


एक गाईड आपल्याला त्याच्या बरोबर stadium फिरवतो आणी मग सीट्स किती, किमती काय? home आणी away च सिटींग कस वेगळं असत का वेगळ असत? त्यांच्या  मारा माऱ्या कश्या होऊ   शकतात  म्हणून दोघान मध्ये एक उंच भिंत कशी बांधली, एक  गम्मत म्हणजे ते stadium,  स्टेशन पासून अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर  आहे, ह्याचा कारण अस कि  म्याच संपली कि लोक चालत जातील आणि त्याचं ब्लड प्रेशर normal होईल. किमान 500  मीटर चालला माणूस कि त्याची body cool down होते हे त्याच्या मागचं  logic.  म्हणजे बाहेर जाउन लोक  मारामारी तोड फोड करणार नाहीत. तिथे क्लब म्याचेस पण अंतर देशी पेक्षा  जास्त हीर  हिरेने खेळतात..TSV 1860 München, Germany national football team, FC Bayern Munich ह्या तीन टीम्स इथे खेळतात , म्हणजे ही होम टीम . इथे दोन होम टीम्स आहेत हे इथल वैशिष्ठ, जर्मन  टीम खेळते ते नॉर्मल आहे.


मग ते  गवत कस वाढवतात (कारण अधिक काळ  थंडी आणि अंधार, गावात वाढणार कस) लाईट कशे लावतात, ते ड्रेसिंग रूम कस असत आणी इतर  बरीच माहिती, अगदी सगळे बारकावे, म्हणजे  जर तुम्ही अगदी die hard football fan असाल तर फारच  मज्जा येईल. अगदी त्या गवताला हात लावायला पण दिला (म्हणजे अगदी Lords वर पीच ला हात लाऊन अम्पायर च्या जागी उभ राहण्या सारखं  ) मग आम्हाला बाहेर नेउन त्या stadium च आवरण दाखवल आणि त्यात काय वापरल आहे हे सांगीतल,  लाखो रंगाचे लाईट लाउ शकतो अस म्हणला  कारण सगळ computerised आहे , पण  एका वेळेला एकच  रंग allowed आहे कारण बाजूला highway आहे आणि लोकांना त्रास होईल (एकदम  भारी, लोकांना त्रास  म्हणजे आपल्या करता विनोद आहे)  अगदी   छोट्या छोट्या गोष्टींचा  बारीक विचार केलाय, अगदी बेसिक पण त्याच फार महत्वाच्या असतात.



सगळ   बघून/ऐकून  झाल्यावर, मग मी पायी चालून त्या स्टेशन वर  गेलो, गाडीत बसल्यावर तोच गाईड भेटला, student होता, sports मधून degree  होता, दिवस भर हे काम मग कॉलेज, ट्रेन ने ये जा, football खेळायचो म्हणाला, पण लक्षात आल कि आपण देशा करता नाही खेळू शकणार , मग हे सगळ्यात best. आणी सगळ्यात चांगल म्हणेज हे मैदान,  ते players, सगळ्यांना जवळून  बघता येत, फक्त फुकट पासेस  मिळत नाही म्हणाला.  football खेळतात का India मध्ये मी  म्हंटल हो हल्ली तर TV मुळे   मुल सगळ्या म्याचेस बघतात पण, पण आम्ही क्रिकेट जास्त आवडीने खेळतो आणी  बघतो  (उगीच आपलं  टीम टीमा वाजवायचा म्हणून ) कारण  ह्याला आपण क्रिकेट बद्दल  काय पण (आणि काहीही )सांगू शकतो, football मध्ये ह्याचा पाय कोण धरणार?

तो माझ्या दोन स्टेशन आधीच उतरला, त्याला पुन्हा एकदा माझ तिकीट दाखवल आणि खात्री  केली (सवय), तेवढ्यात एक जीन्स मधला माणूस लोकांना काही तरी विचारात विचारात माझ्या दिशेने येताना दिसला, TC होता, छाती धड धड करत होती म्हणून मला समजल कि TC अश्णार घाबरत त्याला तिकीट दाखवल, काहीच न बोलता त्याने मला परत दिल तिकीट (सुटलो ) . तेवढ्यात तो वेगाने दारा पाशी गेला आणि एका मुलाला तिकीट विचारल, तसा तो मुलगा ब्याग चाचपडायला लागला, दार उघडताच पळाला आणि तेवढ्यात दुसऱ्या दारातून आजून एक धीपाड  माणूस धावत आला आणि त्या मुलाची गचांडी धरली आणि धरली म्हणजे अगदी  दाब्लाच त्याला भिंतीवर, चिरडून मेल असत ते, एका  क्षणात त्याला उलटा  करून त्याचे हात धरले आणी गाडी पुढे गेली .

डे पास सहा का काही तरी euro चा आहे आणी दंड 35 euro, मी पाहून ठेवल होत  आणि तसेही माझ्या कडे 100 euro होते, सेफ्टी साठी सगळ बघून ठेवतो मी.

माझ स्टेशन आल्यावर मी उतरलो, ताठ मानेन माझ्या hotel कडे निघून गेलो .....  






Monday, November 2, 2015

केरळ - ठेकाडी (Keral -Thekaddy )

आम्हाला शाळेत असताना उटकमंड नावाचा एक धडा होता . उटी बद्दल होता धडा,  त्यात  चित्र होता,  एक  असा छोटा नागमोडी रस्ता होता आणी बाजूला एक छोटा कंदील सारखा street light होता, देवानंद च्या "तू कहा ये बाता" मध्ये कसय त्या टाइप्स , मला ठेकाडी मध्ये त्या संध्याकाळी तो एक फील आला, म्हणजे मे असून  सुद्धा थंड हवा हलका उजेड चार लोक टपरीवर उभे आहेत , कुणालाच घाई नाही लांबून कुठून अस संथ कर्नाटकी संगीत. मी खर तर त्या जंगल बोटीच्या तिकिटाच print out काढायला निघालो होतो. आम्ही एका home stay मध्ये होतो "Kerala House", त्या माणसाने सांगितल कि उद्याच  तिकीट आज काढा मग त्या मागे लागलो त्याच नेट नेमक बंद , मयूर ला सांगून ते काढून घेतल आणी त्याने मला इमेल केल ते  आणायला मी बाजारात गेलो तेव्हा येताना मला हे अस दृश्य दिसल. 

आम्ही मुन्नार हून अकराला निघालो सगळा घात रस्ता एक हिल स्टेशन ते दुसर परत तोच तसाच हिरवा गार स्वछ रस्ता लहान लहान घर हिरवे डोंगर तसाच रस्ता आम्हाला नंतर अल्लेपी ला जाताना पण लागला पण कंटाळा नाही आला तेच दृश्य पाहताना …. और दिखाव और दिखाव अस होत , मी एक पाहिलय इथे हिल स्टेशन ला भिकारी नाहीयेत त्या मुळे त्रास नाही होत, कुणी  मागे लागून वस्तू विकल्या नाहीत की काही नाही. वाटेत एक धबधबा लागला तिथे एक दोन दुकानं होती. वाटेत गाव लागत होती पण तशी सुख वस्तू वाटले सगळे, गरीबी असेल असणारच पण प्रखर्षाने जाणवत नाही. 

एका मोठ्या गावात आम्ही जेवायला थांबलो साध होत हॉटेल पण स्वछ उजेड आणी भरलेल होत गर्दी न्हवती पण भरल होत, त्या टेबल वर एक लाल रांगाच पाणी ठेवल होत सगळ्यांच्या आम्ही मिनेरल मागवल आणि त्या वेटर ला विचारल की काय हे? तो म्हणला की आयुर्वेदिक पाणी , मी पिउन पहिला मला आवडल गरम होत म्हणजे तेलकट खाऊन हे पाणी प्यायचं मस्त पुढे कुठे नाही दिसलं मला हे अस पाणी. केरळ ला मेनू कार्ड  मध्ये  मला एक जाणवल कि फिश बरोबर बीफ आणी पोर्क पण असत मेनू मध्ये चिकन  नाही दिसल (मी नाही खाल्ल )पण सर्व धर्म सम भाव.  तिथे  तो वेटर पण हसरा होता आणि सगळ्यांनी डोक्यावर टोप्या घातल्या होत्या किचेन मध्ये घालतात तश्या. जेवण एकदम सही, कुटुंबाने भाजी मागावली मी अंड आणि भात आणि सांबर , माझ्या मुलीला पण भात फार आवडतो आणि ती लोक उकडा भात करतात पंधरा  नाही सांबर घालून छान  लागतो आणि तिथलं सांबर  पण वेगळ असत भाज्या खूप घालतात आणि परत चटणी देतात. तीच भाजी पोळी खाउन झाल्यावर तिला ही हवा होता सांबर भात पण रीचे प्लेट नको होती त्या वेटर ला विचारल मी अरे नुसता सांबर भात मिळेल का , त्याला समजलच नाही म्हंटल मुलीला  थोडा सांबर भात दे मेनू मध्ये असकाहीच न्हवत मग त्यला समजल त्यानी ताट आणला त्यात भात घातला आणि तिथे खानावळी  सारख सांबर भाजी चटणी घेऊन फिरतात न? तास वाडग  घेऊन आला आणी काय हवय बोला  अस केल म्हंटल सांबर, तीन दिवसाने इतकं परफेक्ट केरळ जेवण मिळाल होत, मस्त भात सांबर ओरपून बिल मगीत्ल तर ३०० त्यात वेटर च पण होत, म्हंटल अरे तू ते सांबर भात नाही लावलास बीलात ? नो नो व्हाट  सर? नो मनी फॉर इट म्हणून हसला त्या सगळ्यांना बाइको ने फार छान जेवण आणी सर्वीस अस पण सांगीतल, थोडी अधिक टीप देऊन आम्ही मग निघालो. गाव असल तरी रस्ते छान   लोक तशीच, म्हणजे एकूणच लोक सेम टू  सेम आहेत इथे , कुठे ही जा मुन्नार ते कोची, आपल्या कडे बघा मुंबई पुण्याचा माणूस वेगळा मुंबईचा आणि पुण्याचा  वेगळा असतो घाटावर वेगळा कोकणात वेगळा विधर्भात निराळा अगदी नाशिक चा सुद्धा निराळा कळतो म्हणजे दिसतोच इथे कुठे हि जा वेशभूषा आणी  जेवण सेम आम्हाला हत्ती  वरूब फिरवलेला आणि बोटीतून नेणारा माणूस सेम कपडे , तोच  वर्ण काहीकाही नाही. तर हे गाव असून खेडे न्हव्ते गाड्या घोडे होते चांगल होत आणि त्यात भिकारी नाहीत, दुपार असून उकडत न्हवत , छान जेवण झाल होत रस्ता सुरेख हिरवं गार सगळीकडे, असा मस्त प्रवास  करत  आम्ही ठेकाडी कडे निघालो

वाटेत आम्हाला ते स्पाइस गार्डन्स लागली, मग आम्ही एकीकडे गेलो आणि खूप सारे पैशे देऊन वायफळ औषध पण घेतली …. म्हणजे स्पाइस म्हणून आत आयुर्वेदिक औषध विकतात. तस तिथे नेउन आम्हाला सगळी बाग फिरवली काय काय उग्त कस कस उग्त ते पण दाखवल छान होती बाग, दगड टाकला तरी  उगवेल अशी जमीन आणि पोषक अस वातावरण त्या मुळे खूप छान पीक काढत असतील ही लोक. ते झाल कि मग आम्हाला त्यांच्या दुकानात घेऊन गेले आणि पोट कमी करायला औषध केस वाढवायला बुद्धी वर्धक आणि अस म्हणून दोन चार असेच काही उत्पादने चिकटवली, खूप चांगलय म्हणून   … काही पण , तर माझा सल्ला असा कि तिथे जा बाग बघा गरम मसाला  घ्या आणि  या बाहेर, औषध वगेरे काही घेऊ नका.

तेवढ्यात मला मी ज्या होम स्टे मध्ये बुकिंग केल होत त्याचा फोन आला चार वाजले होते १२ च चेकीन होत, त्याला म्हंटल आलोच आमचा चालक आणि त्या हॉटेल चा मालक काही तरी बोलले आणि दहा मिनटात आम्ही एका रस्त्यात येउन थांबलो छोट्या रस्त्या कडे बोट दाखून म्हणला  कि हेच आहे,  थोड  घाबरलो मी, पण आत जाउन पहिला तर थक्कच झालो एक तर खोली खूप मोठी होती स्वछ आणि खोलीतून दिसणार दृश्य अप्रतिम होत सगळ पेरियार जंगल दिसत होत मोठच्या मोठ










एक तर येता येता एवढी हिरवळ आणि आता तर अगदी समोर हातच्या अंतरावर ..  आमच्या होम स्टे  kerala house असा होत http://www.keralahouseperiyar.com/index.html . शिबू नावाचा एक चाळीशीतला इसम चेहरा हसरा बाइको हसरी चा मायला सगळेच हसरे खर तर अखं केरळच हसरं आहे आहो पण रोज सकाळी एवढ सुंदर निसर्ग, मे मध्ये थंड गार हवा जेवायला स्वस्तात आणि उत्तम खाण मिळाल तर का रडेल माणूस?

आमचं होम स्टे पेरियार टायगर रिझर्व च्या अगदी हाकेच्या अंतरावर होत , म्हणजे आमच्या घरा मध्ये आणी जंगलात फक्त एक भींत होती (पण आम्ही भिंती वरून काही चढून जाणार न्हव्तो) पण गेट सुधा शंभर पावलांन वर, तिथून आणखी एक किलोमीटर वर ती नदी आणि तिथून ती बोट किव्हा सहल सुरु होते, पाचाला बंद झाल   होत, म्हणून मग इंटरनेट वरून तिकीट काढून मी प्रिंट  आउट घ्यायला बाजारात गेलो तेव्हा मला ते  सगळ सुंदर वातावरण दिसल.


दुसर्या दिवशी सकाळी दहाला आम्ही एक जीप करून  पेरियार च्या बाहेर फिरून आलो, म्हणजे टेकडी धबधबे अस सगळ पाहून आलो तिथून तमिळ नाडू एक पाचशे मीटर वर असेल बॉर्डर  आहे ही दोन राज्यातली, आपल्याला काही फरक कळत नाही तशीच भाषा (तशीच लोक दिसयला) , ह्या लोकांना दोन्ही भाषा येतात पण इकडचे लोक मलायालामाच बोलतात आणी  ती लोक  तामिळ "च" बोलतात (आपण कस हिंदीत "च" बोलतो तस).   तर त्या ओपन जीप   मधून आम्ही तीन एक तास मस्त फिरलो छान निसर्ग, धबधबा , तशेच ते नागमोडी वळणाचे रस्ते टुमदार बंगले आणी  स्वछ हवा अस सगळ डोळ्यात भरत हिंडलो. ड्रायवर लुंगी मध्ये होता, मी इथल्या taxi  union चा अध्यक्ष का तत्सम काहीतरी आहे अस सांगितल आणी मी कोमिनिस्ट आहे अस पण सांगीतल एक  मुलगी msc   होती लग्न करून bangalore  ला आहे नवरा IT मध्ये दुसरी मुलगी Engineering करते  आहे त्याच नसीर अस म्हणला मी काय रोज नमाझ  नाही करत फक्त शुक्रवारी …… आमच्यात धर्म वगेरे नाही मानत हल्ली फार झालंय  म्हणाला. त्याला मधेच एक फोन आला मग तो जीप मध्ये काही तरी  शोधत होता , मग हसत हसत काही तरी बोलला. मुलीचा फोन, सकाळी तिला सोडलं  बस स्टेन्ड ला दीडशे किलोमीटर लांब आहे कॉलेज तिथेच राहते होस्टेल वर , तर तिच्या कानातल पडल म्हणते  आहे जीप मध्ये, आता नाही सापडत , खोत होत मग मी देईन नवीन घेऊन अस म्हणलो.  जगात बाप हा बापच असतो अगदी इंग्लंड ला सुद्धा मी हेच पाहिलं काही अपवाद असतात….

त्याला विचारल मी की इथे हे बंगले इतके महागडे  वाटतात कस काय? ह्या सगळ्यांच्या मसालेच्या बागा  आहेत  अस म्हणाला आणि सगळ्या बागा क्रीस्चन लोकांच्या आहेत (सारखी जात सांगायचा आणि आम्ही जातीत मानत नाही म्हणाला) ही लोक खूप कष्ट करी, म्हंटल गोव्यात जा मग कळेल.   तर ह्या लोकांकडे जागा कमी पण पीक चांगल आहे आणि किंमत पण खूप मिळते, पण ह्याला पोषक जमीन आणि वातावरण लागत. अजून तरी नशीबाने मुर्खा सारखे लोक बांध काम नाही करत सुटत. अजून किती वर्ष राहत  आहे  कुणास ठाऊक ......

दुपारी आम्ही परत सांभार भात खाल्ला आणि त्या पेरियार रिझर्व मध्ये गेलो.  पाउस  पडत होता  आणि आमची  बोट  तीन ची होती आणि ही एवढी गर्दी.   मग तिकीट दाखवून आम्ही खाली बोटी पाशी गेलो पण रांगेत पण लोक अगदी वेड्यागत करतात बोट जाइल ही भीती धक्का बुक्की शेवटी खाली नदी पाशी गेल्यावर समजल कि चार बोटी आहेत आणि तिकीटावर बोटीच नाव आणि सीट नंबर सुद्धा आहे, अगदी  छान व्यवस्थीत जागा मिळते सगळ्यांना,  लोक अगदीच खूळयागत वागतात एक कपल होत ते तर सगळ्या बोटीत लगबगीने धक्का मारून  आत जायचं (प्रान्त्नाका विचारू  मला मुंबईत राहून अस ही लोक प्रांत वादी  म्हणतात), आम्ही बसलो तरी ती लोक तशी खाली उभी होती त्यांची वेगळीच बोट  होती हनी मून कपल ची वेगळी असेल बहुदा.

मग  आम्ही दीड  तास त्या नदीतून संथ पणे ब्रह्मान केल , हरण रान डुक्कर हत्ती सगळे दिसले वाघ काही दिसला नाही, नाहीच दिसायचा तो कशाला येईल दुपारी लोकांना तोंड दाखवायला ? ते जंगल 1300 किलो मीटर आहे आम्ही दहा   पण नाही फिरलो आणी  आम्ही फक्त नदी लगत  फिरलो वाघ  आत अश्णार जंगलात, पण पक्षी मात्र खूप दिसले, केव्हढ निसर्ग आहे तिथे आणि तिथे मधेच एक रेसोर्ट पण आहे  जंगलाच्या मधेच 24000 24 तासाचे, पण सात  नंतर्काय करणार? त्यांची एक बोट असते फक्त, एक दहा जण असतील तर चांगलं  आहे.


आधी आत जंगलात लोकांना जीप ने  घेऊन जायचे आणि मग  पाई पण हल्ली हल्ली एका हत्तीच्या झुंडीने दोघांना चिरडल त्या मुळे बंद आहे. वाघाने अजून एका ही माणसाला मारल नाहीये हात्तीनेच सगळी माणसा मारली आहेत  ....perception दुसर काय ? मुन्नार  चांगल कि ठेकाडी? तर आम्ही अगदीच जंगला जवळ होत जेवण चांगल मिळाल म्हणून आम्ही ठेकडी म्हणू पण निसर्ग मुन्नार ला खूप  आहे .... दोन दिवस राहायला खूप   उत्तम अस आहे ..... आम्ही आता  इथून जाणार होतो अल्लेप्पी .....



















Tuesday, September 8, 2015

केरळ - मुनार (Keral - Munnar)

पहिली गोष्ट जी मला कोची विमानतळा च्या बाहेर आल्यावर जाणवली  ती म्हणजे स्वछःता आणि शिस्त. मला खर तर विमानतळच फार आवडल. छोट आहे पण निट  नेटक आणि स्वछः . तशी मी लहान लहान विमानतळ पाहिली आहेत पण त्यातल हे सगळ्यात छान आहे अस मला वाटल. आम्ही गाडी करून थेट मुन्नार  ला गेलो.

कोची ते मुनार  सगळा घाट रस्ता आहे रात्र असल्यामुळे बाहेर फक्त अंधार आणि अंधार होता, बारीक पाउस होता, पण रस्ता चांगला होता खड्डे नाहीत कि स्पीड ब्रेकर्स नाहीत.  आम्हाला मध्ये मध्ये छोटी छोटी  गाव वजा वस्त्या लागत होत्या, मुसलमान लोकांची पण होती एक वस्ती, मधेच एक चर्च सारख पण लागल इथली धार्मिक विविधता एकदम प्रखर्षाने जाणवली. आमच्या ड्रायवरच नाव  शाहूल होत चांगला शर्ट आणि जीन्स घातलेला आणी  व्यवस्थित गाडी चालक होता तो मुसलमान आहे हे आम्हाला चार एक दिवसाने कळल  कारण एकदा गाडीत  अल्ला अस काही लागल म्हणून .

खूप वेळ (अडीच तीन तास ) गेल्यावर आमच्या ड्रायवर ने फोन केला ते हॉटेल कुठे आहे विचारायला, बाहेर अगदी किरर्र अंधार होता हवा पण थंड होती, मे असून गार  वार पाहून बर वाटल, आम्ही थोड पुढ आलो होतो मुन्नार तस अजून २० एक किलोमीटर लांब होत पण आमच हॉटेल मुनारच्या अलीकडे होत जंगलात आणि नाव होत "forest haven" "HAVEN " असच नाव होत ,  मुख्य रस्ता सोडून आम्ही एक दोन किलोमीटर जंगलात गेलो आणी एका जंगलाच्या मध्यात असलेल्या हॉटेलात गेलो आजूबाजूला नुसती घनदाट झाडीच झाडी …सकाळी बाल्कनी च्या बाहेर पाहिलं तर नुसतच जंगल बाकी काही नाही , हिरव्याच रंगांच्या शंभर छटा अगणीत फुल आणि नाना प्रकारच्या  पक्षांचे आवाज, सूर्यप्रकाश सुद्धा खाली सरळ न येत थोडा जंगलात पानान मध्ये खेळून खाली येत होता, मे महिना असून सुद्धा, बाहेर थंड गार वातावरण, थंडीत काय होत असेल कुणास ठाऊक.


शुद्ध हवा आणि निसर्ग आपोआप आपल्याला  ताज करतो इथे तर फक्त oxygen pollution  नाहीच , हॉटेलच्या पाठी  लहानसा ओढा होता आणी तिथे जाईला एक पायवाट, हल्ली नसतेच न कुठे पायवाट त्या मुळे मला फार मस्त वाटलं, पाय वाट पण लॉन सारखी, दोन दिवसाने मी एकटाच अगदी थेट जाउन आलो खूप सुंदर अशी जागा होती पुढे एक दोन ओढे मिळून थोड मोठ अस पाण्याचा झरा होऊन खाली जात होता आणि रस्ता संपला. वाहत्या पाण्याचा आवाज आणि हलकेच किड्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज, एखाद्या संगीत महिफिलीत असल्यागत वाटल.

थोडा नाश्ता पाणी करून आम्ही मुन्नार ला निघालो, इतका सुबक डौलदार रस्ता होता … म्हणजे आदल्या दिवशी आम्ही इतक्या मन मोहक रस्त्यातून आलो ह्याची जाणीव झाली, ढग खाली आले होते एका बाजूला डोंगर आणि एका बाजूला दरी, विशेष म्हणजे डोंगर सुधा हिरवे गार आणि दरी सुद्धा नुसती गर्द हिरवी God's own country म्हणजे काय ते लगेच जाणवलं, वाटेत एका observation point la थांबलो , तो point म्हणजे एक  दरी होती आणि  ती तुम्ही बघायची. बाजूला दोन दुकानं टाकली होती , आम्ही लगेच शे दोनशे रुपयांची खरेदी केली, वाळवंटात  जरी  आम्ही गेलो न  तरी  सुद्धा आम्ही तिथून पाच पन्नास रुपयांची वाळू आणू ती सुद्धा मुंबईची म्हणून विकली तरी घेऊ , स्वभाव  काय करणार (ह्यावर केरळा आयुर्वेदिक मध्ये पण औषधाला  ही  औषध नाही सापडल, शोधलं मी.) मग पुढे जाउन ह्याने फसवलं  नसेल न?  म्हणून चिंता :).

आम्ही तिथे हत्ती वर बसून फेरी मारायला एक जागा आहे तिथे गेलो तर तिथे ही भली मोठी रांग, मग  आम्ही तिकीट घेतल आणि धरण बघायला गेलो, तर तिथे trafficjam लागला म्हणून वाटेत गाडीवर बिर्याणी खाल्ली आणि परत आलो. त्या हत्तीच्या पाठी बसून फेरी साठी रांग  बघून मला वाटल कि चांगल  असेल  तर  फसवलं आम्हाला १५०० रुपयात पाच मिंट पाच मेटरे फेरी मारली, तरी सुजन वाचकाने अजिबात मुन्नार ला  गेल्या वर त्या हत्ती वर  बसू नये चोर साले, पण हाच काय तो वाईट अनुभव बाकी सगळ केरळ प्रवास उत्तम झाला, ह्या लोकांनी खूप हुशारीने tourism market केल आहे तेव्हा थोडस हे अस चालायचंच.

केरळच एक प्रमुख आकर्षण म्हणजे तिथल्या चहाच्या बागा आणी तिथे असलेल्या चहा चे कारखाने टाटा चेच सोळा सतरा आहेत म्हणे. आम्ही पहिला तो कारखाना चोतेखाना होता बाजूला छोटीशी शोभेला एक चहा ची बाग, खर  तर अख्या मुन्नारला असंख्य चहा चे  मळेच मळे आहेत, सगळे डोंगर त्या मुले हिरवे गार दिसतात एके ठिकाणी तर आम्ही त्या बाईका पण पहिल्या पाठीवर ती मोठ्याली बास्केट घेऊन चहाची पान वेचताना. तर त्या कारखान्य मध्ये पहिल वहिल चहाच मशीन मुन्नारच   पाहिलं टेलेफोन exchange (त्याचा चाहाशी असलेला संबंध नाही समजला) गोऱ्या साहेबाचे चित्र, पूर आलेला त्या वर्षाचे चित्र वगेरे, मग आम्हाला तो कारखाना सापडला अलीकडे होत ते museum असेल, खूप निरनिराळे वर खाली जाणारी यंत्र, त्यात फिरणारी पान, चहा ची पावडर निघणारा एक यंत्र मग  चाळणी , आम्ही नुसते इकडे तिकडे फिरत होतो आणि अचानक तिथल्या एका कामगाराने एक चहा प्रेमी लांबून ओळखला, हसला आणि खुणे ने या म्हणाला, मला काहीच नाही समजलं , म्हणून  त्याने माझा हात धरला आणि पहिल्या यांत्त्र कडे घेऊन गेला आणि पोत्याटली पान माझ्या हातात टाकली आणि टाक म्हणाला आणि आमच्या कुटुंबाला काढा फोटो, अस करत त्याने मला अक्खा कारखाना फिरवला आणि तोडक्या मोडक्या भाषेत मला सगळा process समजावला इतका काय माझा चेहेरा खुलला होता कि फोटो पण बरे आले माझे. पण ही लोक  खूप हसरी आहेत  सारखी तोंड वर smile आणि हा माणूस तर मला अगदी देवदूता  सारखाच वाटत होता, मला स्वर्गातूनच त्याने हिंडून आणल होत अगदी हात धरून, मग आम्ही खरेदे  केली (ते सांगायलाच नको)पण हा माणूस काही दिसे न  शेवटी सापडलाच, एका बाकावर बसला होता (हसत)त्याले टीप म्हणून  थोडे पैशे दिले तर असू देत म्हणाला, शेवटी दिलेच मी, पण एरवी आपल्या मागे लागोन गोष्टी विकणारे आणि हा स्वताहून आपल्याला कारखाना दाखाहून पण पैसे नको म्हणारा माणूस बघून मी त्याचा चहा ता झालो.











एकाच गोष्टीची फार खंत वाटली  त्या चहाच्या कारखान्यात डीप डीप चहा होता चान उकळून नाही दिला :( . म्हणजे चहा नको का हो द्य्याला चहाच्या कारखान्यात? आता कोकणात canned tuna दिला तर चालेल का? भोपाळला गोदरेज फूड्सच Audit करताना आम्हाला ती  लोक पाण्याच्या बरणीत ते jumping च fruit juice दय्याचे एकदम ताझं, तसा चहा मिळाला असता तर गळ्यातली माळच  काढून दिली असती मी पूर्वीचे राजे द्यायचे तसे.

दुसर्या दिवशी आम्ही थोड (जास्तच)  आरामात निघालो आणि तसही आमच हॉटेलं पासून मुन्नार तासा भराच्या अंतरावर होत  त्या मुळे आम्ही मुन्नार ला शीरतानाच एका चांगल्या ठिकाणी जेवलो. आमच्या हॉटेलात मल्लू खाणं नसून पंजाबीच होत आता केरळ ला जाउन पंजाबी कोण खाईल? पण तो वेटर म्हणला कि सगळे गेस्ट बाहेरचे असतात न म्हणून नाही करत मल्लू , तिथे तर नाश्ता करायला एक गुजराती कुटुंब शेव, पुऱ्या, ठेपले, लोणची आणि अस बरच काही घेऊन यायचे आणि तो सगळा नाश्ता करायचे …. आत्ता बोला ही लोक काय खाणार मल्लू जेवण? अंड बघून नाक मुरडलं  बाईने …. जाऊद्या नसत सगळ्यांच्या नशिबात   मासे खाणे. तर पहिल्यांदा आम्हाला त्या हॉटेलात केरळ special माशे आणि  भात खाईला मिळाला त्या नंतर खुपदा म्हणजे रोझच मी सांबर भात नाहीतर तत्सम काहीतरी खाल्लं.

मुन्नार अख्खं टेकडी वर आहे  सगळे वेडी वाकडी वळण आणि घाट रस्ता, म्हणजे तुम्ही जर  नुसतच जर गाडीतून  फिर्लात न तरी सुद्धा एक सहल होते.  ड्रायवर  आम्हाला एका थीम  पार्कला घेऊन गेला रोप वौकिंग ,सायकलिंग अस काहीतरी होत प्रवेश शुल्क १५०० का काहीसा होता आणि बसा किव्हा नका तेवढेच पैशे मग आम्ही  तिथे न जात सरळ Eravikulam National Park ला गेलो, तिथे भली मोठी होती, पण आम्ही जायचच  अस ठरवल होत म्हणून थांबलो, एकूण अस लक्षात आल कि लोक तिथे कॅम्प करायला वगेरे जातात, मग समजल कि ती रंग बस साठी होती,पण ती बस कुठे घेऊन जाणार वगेरे काहीच ठाऊक न्हवत. एक  तास भर थांबल्यावर आमचा नंबर लागला आणि ती बस आम्हाला अजून एका उंच टोकावर घेऊन जायला लागली, अगदी एक गाडी जाइल एवढीच जागा, मधेच एक गेट आणि मग सुसाट वेगात तो बस वाला निघाला समोरून तशीच छोटी बस आणि आमची बस  एकदम कडेला  जाउन थांबून पुढे गेली, साधारण  पणे आपण सगळ्यांनीच अश्या चित्तथरारक बस मधून प्रवेश  केला असतोच त्यांच्या करता रोजचच  काम  असत आपण उगीच जीव मुठीत घेऊन बसतो. एका वळणावर मग अचानक आम्हाला   एक ढग  खालून वर  येत असताना दिसला आणि सगळी लोक सैर वैर होऊन फोटो काढायला धावले मग कुणाच्या ही लक्ष  त्या  रस्त्या कडे गेले नहि.

एक दहा मिनटाने आम्हाला  त्या बस ने एका डोंगरावर सोडला, आता काय? तर  ते National  Park निलगीरी थार  नावाच्या एका बकऱ्या साठी प्रसिद्ध आहे तो प्राणी डोंगरावर राहतो आणी  सहज कडा चढतो, जगात सर्वात जास्त बकरे इथेच ह्याच ठिकाणी मिळतात. वास्तविकता हे बकरे साहेबांनी आपली शीकारीची हौस भागवायला आणले होते, पण आता हे एक  "Reserve" आहे इथे (आणी भारतात )आता (कायद्याने) बंदी आहे. परत एका चढाई वर आम्हाला चढायला लागल , त्या गेट च्या आत जाउन नुस्त चालायचं होत मैल भर, मला टिकेट सापडलाच नाही, एक तर कुणी टिकेट विचारल की  मी खूप घाबरतो, उगीच , मग त्याला मी इतर सगळी कागद दिले पण टिकेट काही दिले नाही, पण हे केरळचे लोक हसरीच असतात, राहूद्या राहूद्या चालेल म्हणला (ते टीकेत तीन दिवसाने मला माझ्या पाऊच  मध्ये नित घडी करून ठेवलेल दिसल).  तो छोटा स रस्ता इतका मोहक होता एक तर ढग खालून बघायची सवय त्या मुळे वरून खाली ढग बघायला वेगळच  वाटत होत, तस आपण विमानातून बघतो, पण हे उभा राहून मोकळ्यात आणि ते ढग अशे एकदम घरातून निघाल्या सारखे, धूर असतो बघा असा चिमणीतून किव्हा कोकणातल्या घरातून असा निघत असतो? तसाच पण पांढरा ….  शूभ्र  थवेच थवे … थंड वातावरण सग्ळ  हिरवगार विविध आकाराचे ढग डोंगर झाड  छोटा रस्ता , एकदम ताज तवाना वत्ल.  मग आम्ही  शेकड्याने फोटो काढले, पण क्यामेरा भाव टिपतो  भावना नाही ते वाहणारे ढग थंड हवा सळसळणारी पान कसा काय टिपणार? त्या पेक्षा दोनच फोटो काढून चार घटका त्या जागेचाच आस्वाद घेतला असता तर जास्त बर झाला असत. हे दृश्य माझ्या  मनात अगदी थांब रुतलं आहे, त्या झुरिक च्या छोट्या विमानात बसून ते आल्पस पहिला होता न?अनेक वर्षान पूर्वी तस झाल नशिबाने तेव्हा माझ्या कडे विमानात न्हवता क्यामेरा नाहीतर त्या फोटो पाई मी आल्पस बघितलाच नसता. तर आम्ही मह ते मैल बर अंतर चढलो तो बकरा वजा हरण पाहिलं त्याचा पिल्लू पहिल. पुढे एक गेट होत, मला वाटत ते  आतल्या hiker लोकां साठीच होत , काय मस्त वाटेल न? रात्री मिट्ट अंधार आणि अस फेर फटका मारायचं.  खूप सोंदर्य सुधा कधी कधी गूढ आणि थोडा भीती दायक वाटू शकतो. कोल्हापूर ते कोकण जाताना त्या राधानगरी घाटात असच दिसत निसर्ग ……

दोन अडीच तास फिरून मग आम्ही पुन्हा बस च्या रांगेत उभे राहिलो आणि दहा मिनटात खाली आलो, पण खाली पण चांगल होत. वाटेत थांबून कडक चहा घेतला (तो लागतोच त्याच्या शिवाय पान हलत नाही आणि इथे तर पान सुधा चहा चीच).  वाटेत थांबून आम्ही भुट्टा  खाल्ला आणि गम्मत म्हणजे तो भुट्टा  शेकायची पद्धत मला आवडली.  आमच्या लहान पणी , कालही वाला यायचा तो काय ते पोव्देर लावायचा आणि हाताने एक चक्र फेरउन अशी आग काढायचा  त्या वर ते पातेलं उपड  ठेऊन मस्त गरम करायचा, तर ही लोक भुट्टा असा भाजत होते.


मुन्नार ला एके ठिकाणी कथकल्लि  आणि कालारीपायातु चे प्रयोग होतात तास भाराचे कार्यक्रम असतात आम्हाला काय त्या नाच मध्ये रस न्हवता म्हणून आम्ही तिथे तो मारामारी वाला कार्यक्रम पाहिला (टीकेत तस महाग आहे, पण लोक कला जपतायेत म्हणून चालेल), अस खाली कुस्तीचा कसा आखाडा असतो तस  होत तीन बाजूला बाजूला वर अश्या खुर्च्या टाकल्या होत्या आणि खाली त्या हौदा सारख्या जागेत ती मुल काय काय करामती  करत होती म्हणून सांगू , चाकू म्हणू नका तलवार म्हणून नका दान पट्टा म्हणून नका वेड्या वाकड्या उद्या काय धाधड उड्या  काय मग  दिवे घेऊन काय नाचले फारच छान, म्हणजे लोककला जपायची आणि त्यात थोडे पैसे मिळाले तर तरुण मुल सुधा त्यात अपोप येत असतील न, साधीच मुल होती, पण मग नेहमी सारख फोटो काढायचे आहेत का? अस म्हणून फोटो काढून थोडे पैशे कमवायला बघत होते . पण काय हरकत आहे ते थियेटर वाले जबर पैशे घेत होतेच न? त्या पोरांनी सुधा थोड कमवले तर काय हरकत आहे? ह्या लोकांच एक खूप चांगलंय म्हणजे त्या लोकांनी पर्यटन ह्याचा खूप चांगला उपयोग करून घेतला आहे आणि फार महाग अस हि नाही आणि खूप गर्दी केली आहे घाण आहे बाहेरची लोक घुसून काही धंदा करून त्रास देतायेत असही नाहीये. ती लोक मुळातच हुशार असतात आणी जाज्वल्य अभीमान आपल्याकडे चार लोकांपुढे मराठी बोलायला लाजणारी माणसं आहेत. आपलेच पाय  खेचायचे आणि आणि बाहेच्या लोकानां आत येऊ द्यायचं. महाराजान पासून चालू आहे  आता काय बदलणार?



मग आम्ही "परत" थोडी खरेदी केली (आणी मी चहा घेतला), दुकानदार बाई होती मी चहा घेतला तिथे पण, बाइका भारी आहेत (म्हणजे नुसत्या शरीराने नाही), खूप ठिकाणी पाहिलं मी, जाताना वाटेत काहीतरी खाईला घेऊन जाऊ असा विचार केला, कारण केरळात पनीर नको वाटत होत अस ही मला पंजाबी जेवण फार रुचत नाही आणि त्यात एक मल्याळी माणूस करणार म्हणजे बोंबलाच. आमच्या हॉटेल जवळच (तरी एक चार किलोमीटर अंतर असेल) एक घागुती हॉलिडे होम होत तिथे थांबून विचारल तर एक माणूस tv पाहत होता, काही नाही म्हणला, मुलीला बाथरूम ला जाईच होत, त्याला विचारल जाऊ दे का? हो हो म्हणला मग ती आणि तिला सोबत म्हणून बाईको  दोघी गेल्या घराच्या पाठच्या बाजूला, इथे स्वचः असत त्यामुळे तसा प्रोब्लेम न्हवता. बाहेर मी थांबलो होतो तेव्हा एक बाई मला स्वयपा घरात जातान दिसली तिला विचारल काही खाईला मिळेल का म्हणून  थांबा बघते म्हणाली, तो पर्यंत दोघी आल्या मग ती बाई बाहेर आली आणि काय हवाय म्हणाली म्हंटल काय द्या असेल ते, संभार आहे, फिश फ्राय  एकच आहे पोळ्या देते म्हणली , म्हंटल लोकल खाईला मिळालच नाही आणि ही आमची मुलगी वेज आहे  म्हणालो, बर म्हणाली देते मी  सगळ जेवण,  तीन बांधून दिल खूप सार , आमच्या हॉटेलात  जाउन पहिल तर तिने भाजी कोशिंबीर मासा सांभार भात पोळ्या  असा  सगळाच दिल होत. किती झाले? १७५०- माझा चेहरा लगेच बोलतो आ वासून बघीतल तर तिने कागद दिला त्यात १७५/- अस होत अरे सॉरी सॉरी… एक शुन्य जास्त लावला चुकून. म्हणजे एक वीस सेकंदात माझ्या भावना कौतुक  आश्चर्य राग  आदर इतक्या ठिकाणी फिरून आल्या, मग आम्ही सगळेच हसलो तिला दोनशे दिले म्हंटल ठेवा "लीली आणटी" तीच Lilly Gardens  Holiday homes नावच हॉटेल चालवतात नवरा बायको. तिने पण हसून स्वागत केल निरोप दिला आणि जेवण गरम आणि स्वस्तात दिल. ह्या छोट्या गोष्टीन मुळेच खूप फरक पडतो आता आम्ही तिथे आयुष्यात परत कधी जाणार सुधा नाही हजार मागितले असते तरी मला द्यावे लागले असते, पण त्या बाईने आम्हाला फक्त भाताचे आणि माश्याचे पैशे लावले होते मुलीला फुकट दिल होत, पण हा अनुभव मला आणिक के दोन दा   आला सांभार राइस चे काय पैशे घेणार मुलीलाच देताय न ?


त्या दिवशी पोट आणि मन दोन्ही भरून गेल …. दुसर्या दिवशी आम्हाला ठेकाडी ला जाईच होत …

Sunday, June 21, 2015

मुनिक - जर्मनी - 4

मुनिक - जर्मनी - 4

आपल्याला सगळेच गोरे  सारखे दिसतात आणि वाटतात पण जर  तुम्ही थोडे देश फिरलात तर  त्याचांत किती फरक आहे ते समजतजर्मन माणूस मला जरा गंभीर वाटला , म्हणजे  इंग्रज कसा शिष्ठ दिसतो फ्रेंच माणूस मस्कर्या किव्हा एकूणच प्रेमात  दिसतो, डच माणूस साधा वाटतो आणी संसारी तसा हा जर्मन जरा धीर गंभीर वाटला,  म्हणजे दुकानात गेलो कि माणस "Hello" अस म्हणतात पण एकूण उगाच अघल पघल करणारा वाटला, मी आलो म्युनिक ला तेव्हा पण तो इमिग्रेशन वाला अजीबात  हसला नाही एक तर  साडे सहा फूट होता रुंदीला.  मी उगीच निष्फळ प्रयत्न केले good morning वगेरे म्हणायचे ,
taxi वाली आजी होती, सिगरेटचा वास येत होता, ती पण फक्त आत बसताना हसली बाकी गंभीर, हॉटेलात तर काय मज्जा, तीन पर्यंत खोली नाही अस म्हणणारा माणूस . पण मला वाटत त्यांच्या इंग्रजी येण्या मुळे असेल , मुंबईचा भैय्या बोलेल का तुमच्याशी इंग्रजीत?

पण  ही लोक परिस्थिती मुळे असेल का काही असेल, आहेत एकदम भक्कम रुंद आणि उंच पुरी कष्टकरी दिसतात शेक ह्यांड केला कि हात तुटायला हवा आणि warm  आहेत . एक तर  अखंड युरोप सायकल प्रेमी दोन वरशाच मुल कि ऐशी वर्षांची आज्जी सारे सायकल वर  फिरत असतात आणी  सगळे जण  काहीतरी खेळ खेळत असतील अस वाटत, फुटबॉल  तर हमखास आपण कस क्रिकेट खेळतो (कुणी एके काळी असेल, हल्ली मोबाईल  खेळतो) तस फूटबोल आणि क्रिकेट ला कस सगळ्यांना व्यायाम नाही होत बॉलर  लाच होतो तस  नाही  फुटबॉलच सगळे मर मर धावतात. बर्फ पडला कि आईस  स्केटिंग करतात  पण व्यायाम करतातच. 

इकडे लोकांच बियर वर फार प्रेम आहे बार मध्ये लहान मुल आज्जी आजोबा सगळे असतात, दारू नाही पीत कुणी आणि आपल्या सारखा नसतो बार, इथे लोक अतिरेक नाही करत कसला आणि सगळ एन्जोय करतात. आठला हाफिसात  येतात, पाचला घरी मग खेळ आणि दारू आणि भटका. खाईचे काहीच चोचले नाहीत एक तर कच्च नाहीतर उकडलेल, कशाला हवाय रांधा वाढा ? आणि थंड असत सगळ वातावरण अन्न होतंय कशाला खराब?लोक सिगरटि फार ओढतात इथे, सगळेच जवळ पास (अस मला वाटल बुवा), सिगरेटची थोटक काय ती दिसतात रस्त्यात बाकी कचरा नाही, गाडीत बंदी आहे काही स्टेशनात पण आहे, दुकान नाही म्हणा इथे  पानाची पण स्टेशनात सुधा मशिन्स आहेत सिगरिटिचि, थंडीच एवढी असते कि ओढावी लागताच अश्णार, मी पहिल्या दिवशी पाटील आणी  कुटुंब ह्यांच्या बरोबर ज्या खीम्झी कासल पाहायला गेलो तेव्हा आमची गाईड एक बाई होती आणि इथे तश्या सगळ्याच कमान  करता बायकाच पुढे असतात , Airport वर पण taxi वाली आजी होती आणि गाईड म्हणून पण बाई, ती वास्तविक रोमन होती, पाच वर्ष अमेरिका, पाच वर्ष ब्राझील इथे पण पाच वर्ष झाली होती तिला. ती इतर वेळेस लोकांना  इटालियन आणि फ्रेंच शिकवते म्हणाली.  स्टेशन वर enquiry ला पण बाई होती होती, एक दोन दा ट्रेन बस चालवताना बाइका दिसल्या , दुकानात हॉटेलात बाइका जास्त. गाईड तर बाइकाच.