Saturday, May 24, 2025

शेरगाव - अरुणाचल प्रदेश

शेरगाव - अरुणाचल प्रदेश  

मार्च मध्ये मी अरुणाचल मध्ये चार दिवस फिरलो, मी पहिल्याल्या  पैकी अगदी वरचा नम्बर लागेल अशी हि जागा आहे, बर्फ रस्ते धुकं पाणी दऱ्या घरं आणि लोकं ... लोकं , मी मेघालय पाहिलं, खूप सुंदर पण लोक एकदम विचित्र वाटली धड उत्तर नाही इंग्लिशचा  अट्टाहास , त्या पेक्षा कैक पटीने मला अरुणाचल सुंदर वाटलं आणि लोक हिंदी बोलतात , पण मी आज फक्त शेरगाव नावाच्या एका जागे बद्दल लिहणार आहे, बाकीचं तुम्हाला सगळे सांगतील पण ह्या गावाचा उल्लेख फार कमी मिळेल जास्त लोकं नाही त्या मुळे पण हे गाव सुंदर राहिलंअसेल. 

आम्ही खरं तर तिथे जाणार न्हावतोच पण वाटेत धुकं लागलं म्हणून रस्ता वाकडा करून  तिथे गेलो , तुम्ही कधी गेलात तर बोमडिला वरून खाली येताना उजवीकडे जायला  तुम्हाला एक बोर्ड दिसेल तो घ्या , तो रस्ताच सुंदर आहे , नाग मोडी वळणं , वाटेत खूप ठिकाणी तुम्हाला मिलिटरी ची पोस्ट लागेल पण  अरुणाचल प्रदेश  मध्ये सगळी कडेच आहे ते. आर्मी जास्त लोकं कमी. 

असं सुंदर वाटेतून जात असताना अचानक गूगल म्हंटल आलात शेरगाव ला , आम्ही जवळ असलेलं एक हॉटेल पाहिलं , छान होतं , नदी वाहत होती, समोर डोंगर आणि रूम पण एकदम टकाटक म्हणजे थोडं जास्तच चांगलं होतं, किंमत पण जास्तच होती, आम्ही नाही घेतलं कारण सकाळी लवकर निघायचं होतं. पण एखादा दिवस असेल फॅमिली असेल तर नक्की राहा , मी नी मित्रच होतो उगाच ५००० का द्या असं झालं ? लगेच पुढे एक होम स्टे सारखं मिळालंच आणि नंतर कळलं कि खूप आहेत हॉटेल्स आणि महागातली पण आहेत. 

हे गाव फार तर शे दोनशे मीटर आहे,  तुम्ही आंबोलीला गेला असाल तर तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय. गाव असं सुरु होत आणि समप्तं पण निसर्गाने भरभरून दिलंय,  खूप दिलंय म्हणून माणसं पण आनंदी आहेत (आता काश्मीर बघितलं कि कळतं कि निसर्ग आणि आनंदी माणूस हे समीकरण सगळीकडे लागू होत नाही म्हणा). आम्ही असच चक्कर मारायला गेलो आणि एक सुंदर झरा लागला पुढे कुठे तरी धबधबा आहे असं गूगल म्हणाला , पण ना इथे ५ ला अंधार बुडुक होतो म्हणून आम्हाला पाहता नई आला. रस्ता सुंदर, नो गर्दी ,  छोटे खानी गाव १५-२० दुकानं (त्यात दारूची दोन), हॉटेल्स, काही भाजी विकायला,  काही केक शॉप अशी दुकानं आलेत  . एक बाई मोमो आणि चहा विकत होती, थोडा पाऊस पडत होता म्हणून आम्ही थांबलो आणि मोमो घेतले एक प्लेट तिने १० दिले ५० ला आणि छान भरलेले चवीला अप्रतिम . ती बाई काय आनंदी होती ... आता त्या गावात किती कमावणारे ती? पण बाई हसत मुख. मला वाटतं रस्त्या च्या पाठी डोंगरात लोकं राहत असणार पण तेच ५०० ते ७००.  शाळा पण होती , मला शाळेत जाणारी लहान मुलं फार आवडतात हि इथली पोरं पण जाम गोड दिसतात , पुढल्या खेपेस राहीन एक दिवस अजून. 

थंडी बेताची होती , बेताची म्हणतोय कारण आम्ही तवांगला बर्फातुन आलो होतो, पण छान होतं सगळं , वर आकाश पाहिलं तर सगळॆ तारे दिसले.  मुंबईत आकाश दिसतच नाही म्हणून एकदम एवढं मोकळं आकाश पाहायची सवय गेलीये , पण फार सुंदर होतं. जेवायला उत्तम मिळालं आणि स्वस्त फार , घरगुती असल्या मुळे फार मसाले नाही काही नाही . परत आग्रह पण केला त्यांनी . एकूणच नॉर्थ इस्ट ला मसाले कमी वापरतात , नॉर्थ ला भडीमार असतो तसा इथे नसतो. 

सकाळी वॉल्क ला गेलो तेव्हा वर्ष भराचं oxygen घेऊन आलो , इतकी रम्य सकाळ मी क्वचित पहिली असेन , खूप प्रसन्न,  पाऊस न्हवता,  निरभ्र आकाश, छान पाणी वाहतंय,  शेजारी डोंगर वाहन नाही गर्दी नाही हॉर्न नाही सगळं स्वच्छ , त्या ५०० लोकांच्या गावात सुद्धा एक दोन लोकं मला सकाळी धावताना दिसली ... बरं वाटलं  मला , अहो इतकं शांत गाव कि  कुत्री सुद्धा मागे नाही लागली बाहेरचा माणूस पाहून... दोन आर्मीचे ट्र्क मात्र दिसले मला. सकाळच्या उजेडात एका समजलं कि गाव फक्त टुरिस्टवरच चालतं बहुतेक,  खूप हॉटेल्स होती, सगळ्यात जुनी मोनेस्टरी आहे असं तो माणूस म्हणाला , हे असं सगळेच म्हणतात . पण छान फील गुड वाल गावं वाटलं. 

ज्या माणसा कडे आम्ही राहिलो होतो तो सरपंच होता, त्या मुळे दोन गाड्या वगैरे होत्या , सधन वाटलं गाव तसं काय करतात कुणास ठाऊक, सकाळ ७ लाच निघालो आम्ही, चहा दिला त्या बाईने, पैसे वगैरे नको म्हंटली चहा चे , नाश्ता करून जा म्हणाली पण आमहाला गुवाहाटी ला जायचं होतं म्हणून आम्ही तसेच निघालो. फार हाव दिसली नाही म्हणून जास्त बरं वाटलं, त्याने कार्ड पण दिलं परत नक्की या असा आग्रह पण केला :). रात्री थोड्या गप्पा काय मारल्या आम्ही तर एकदम मित्र सारखा झाला , मुलांची अतिशय कठीण नावं सांगितली , मला तेव्हाच लक्षात नाही राहिली. 

जाताना एक ५० किलोमीटर सुंदर रस्ता आहे , कधी गेलात तर अवश्य जा ... 



त्या गावाला सगळ्यात जवळचं  मोठं ठिकाण  म्हणजे बोमडिला अडीच तीन  तासा वर, आपल्याला लहानच वाटेल. गुवाहाटी ७ तास स्वतःची गाडी असेल तर  , बाकी मला काही ST वगैर दिसली नाही , ह्या लोकांनां कुठेच जायचं नसतं , केवढी happy वाटली, मेजर हॉस्पिटल नाही जवळ पास , डॉक्टर चा बोर्ड पण नाही पहिला गावात,  केमिस्ट नाही आता आर्मी चा तळ जवळ असल्या मुळे तो एक मोठा फायदा आहे म्हणा , पण बाकी छान होतं आयुष्य त्यांचं ... केबल होता घरी त्या माणसाच्या . आता मोबाईल मुळे इंटरनेट पण हाताशी आलय म्हणा.  पण बाकी आपली हि वण वण ओढाताण सगळं व्यर्थ वाटतं कधी कधी . .. चार दिवस इथे नुसतं राहिलो आपण तरी फ्रेश होऊन जाऊ ... फार लांब आहे जागा नाहीतर गेलोच असतो ...पण जाऊन राहणारे मी  अजून एकदा ...