अमेरिका आणि यूरोप मधला फरक नक्की काय हे मला नीट सांगता येत न्हवतं , पण आज पॅरिस एअरपोर्ट ला उतरलो आणि एका क्षणात उमगलं, अमेरिका दांडगोबा आहे आणि यूरोप मध्ये नजाकत आहे , सरळ सोईस्कर पण खूप प्रचंड मोठं म्हणजे अमेरिका , आणि टुमदार डौलदार म्हणजे यूरोप. या CDG (paris airport )विमानतळा वर बसण्याची सोय केली आहे ती इतकी creative आहे कि काय सांगू. अमेरिकेत सरळ सोट खुर्च्या, इथे जरा वर खाली उभ्या आडव्या... थोडं अराम खुर्ची टाईप दहा बारा खुर्च्या , छोटे खानी बार .... (आणि फार गॉड भाषेत बोलणारी ती सुंदर तरुणी)पु लंच्या भाषेत सुबक ठेंगणी
अमेरिका थोडी कृत्रिम वाटते, लोकं उगाच आनंदी आहेत असे दाखवतात तोंड भर हसतात , यूरोप चा माणूस नैसर्गिक खुश आहे. अमेरिकन माणूस काम आणि काम करतो असं वाटलं आणि खेळ, मनोरंजन पण एक काम असल्या सारखं करतो आणि यूरोप वाले काम पण मनोरंजन म्हणून करतात.
ऋजुता ला मी एक कार्यक्रम अटेंड करायला सांगितला होता , म्हणजे तीन दिवस, योग् आणि श्वास कसा घ्यायचा वगैरे , तिला विचारलं कि परत करायचा आहे का एकदा (फुकट आहे ), तेव्हा ती म्हणाली कि नको , फार जास्त पॉसिटीव्ह पोस्टिव्ह आणि सारखं स्माईल करा म्हणतात. त्यात गैर काही नाही हसणं चांगलंच असतं , पण उगाच स्माईल कशाला? हा फरक मला इथे जाणवला, उगाच hey असं म्हंणून काही बाही बोलायचं. आनंदी असल्याचं दक्खवायचं ... म्हणून एकदम चिडून गोळ्या घालतात बघा, माणूस मारून टाका, असं करतात. भारतात आपण खूप भांडतो आय माय काढतो पण बंदूक घेऊन गोळ्या नाही घालत हो. हल्लीची मुलं मला वाटतं अमेरिकन पण ला जास्त फॉलो करतात ... गोळ्या नाही, पण उगाच सोशल होतात व्हाट्सअप मॅन वगैरे
दुसरं म्हणजे सारखी शर्यतीत असतात हि लोकं काही तरी नवीन रोज नवीन, छन्द आणि व्यसन ह्यातला फरक आहे, सारखं पळा पळा ... यूरोपात निवांत असतो माणूस.
मला अमेरिका आवडते , खूप मोठं प्रचंड आहे सगळं तरी स्वच्छ आहे शिस्त आहे , गैर समज नसावा मी फक्त जाणवलं म्हणून लिहिलं