घुलामी :
मी सवयीचा गुलाम आहे, कुठे जायचं असलं कि रात्री झोप नाही, गजराच्या आधी दोन तास उठायचं आणि गजर वाजे पर्यंत कुशी बदलत जागायचं. आता खरं तर मी हल्ली दर आठवड्याला दर बदल करत असतो, पण तरीही ९ च्या विमानाला ७ ला एअरपोर्ट गाठायचा हि सवय आणि त्यामुळे चार ला उठायचं. तर आज मी असाच साडे सातला निघायचं म्हणून मध्य रात्री पासून जागा राहून एअरपोर्ट ला पोहोचलो आणि मला कळलं कि विमान रद्द आणि कहर म्हणजे मला जी फ्लाईट दिली ते रात्री ११. म्हणजे सकाळी सात ला विमान आहे म्हणून नीघालेला मी आता १४ तास करू काय ह्या संभ्रमात पडलो . जरा गाव हिंडून यावं म्हंटल आणि उबर शोधायला मोबाईल बघितला तर मला साडे पाच ला sms होता, विमानाची वेळ बदलल्याचा. पण इथे अमेरिकेत नवीन नंबर त्या मुळे sms कोण बघतोय आपण whatsapp चे गुलाम .
अर्धा तास चीड चीड करून (स्वतः वरच, इथे कोण विचारतय मला?) मी शेवटी त्या बाईला विचारलं कि कुठे फिरू शकतो का? ती म्हणाली कि ह्या विमान तळावरच्या शटल नी जा म्हणजे बाहेर तुला मेट्रो मिळेल, चार डॉलर मध्ये दिवस भाराचा पास मिळतो. मग मी चार मजली escalatar चढून गेलो तर नुसती ह्या टर्मिनल पासून त्या टरमीनल ला जाणारी शटल. आता शटल म्हणजे खर तर मेट्रोच आहे. मी गोंधळलो, शेवटी एका माणसाला विचारलं (माझा अजून माणसा वरच जास्त विश्वास आहे) कि अरे गावात जायचंय (गाव म्हणजे शहर) कस जायचं? त्यांनी एकदम सविस्तर सांगितलं, आधी हि विमानतळावरची मेट्रो घे दोन स्टॉप जा , मग उत्तर, एक दोन माजली escalator लागेल ते उत्तर, मग समोर एक मोठा ब्रिज दिसेल तो पार कर, तो संपला कि खाली उत्तर, ते स्टेशन त्या मेट्रो च ..... (हे सगळं गूगल बाई नाही सांगत, इथे तर head north west take second exit असं म्हणते मला डावीकडे उजवीकडे कळत ईशान्य , नयऋत्य म्हणलं कि भोवळ येते) तर मी तसाच गेलो आणि बरोबर उतरलो. पण मला काय ते टीकेत मशीन टीकेत देईच ना, म्हणजे माझं कार्ड ते घेतच न्हवत आणि माझ्या कडे चार डॉलर सुट्टे न्हवते , तेवढ्यात तिथून एक मुलगी आली, ती त्या मेट्रो मधेच काम करणारी होती, तिने पण प्रयत्न केले, पण नाही , अजिबात ते मशीन कार्ड घेत न्हवत , मग तिने शांत पणे दोन नाणी खिशातून काढून मला तिकिट दिल, मी म्हण्टलं अरे असं काय, असू दे म्हणाली, मी म्हंटल थांब मी बघतो थोडे सुट्टे आहेत का , तर दोन नोटा मिळाल्या एक डॉलर च्या मी बळेच तिले दिले, ती नाहीच म्हणत होती, शेवटी घेतले आणि म्हणाली कि वचन दे कि तू पण अशीच मदत कुणाला तरी करशील. pass on the kindness :). सगळं अजब आहे इथे, एरवी कुणी तुम्हाला विचारात पण नाही आणि इथे हे असं, म्हणूनच हा देश तरलाय, तरलाय कसला? चांगलाच बहरलाय ..त्या दिवशी जेम्स आणि आज हि ...तेजस नी सांगितल्या पासून सारखेच एंजेल भेटायला मला :).
मग तीच मुलगी मला इथे जा तिथे जा सांगत होती, पण माझ्या कडे भली मोठी बॅग होती (केबिन बॅग पण कपडे होते त्यात दोन आठवड्याचे), कुठे फिरू म्हंटल, मुसियम वगैरे आहेत ना? खूप आहेत सायन्स आर्टस् कल्चर इतिहास सगळेच . बघून ये म्हणाली दोन चार आणि दोन चार ठिकाणची नाव सांगितली . मी बघतो म्हणालो. मग सवयी प्रमाणे एक स्टेशन आधी उतरलो, पुढच्या गाडी करता थांबलो आणि मग करेक्ट ठिकाणी गेलो. ही मेट्रो म्हणजे ट्राम सारखी आहे, रस्त्याच्या मधून असते, रूळ असतात, पण रस्त्यातून जाते, म्ह्णून जिने चढा उतरा असा प्रकार नाही. माझ्या कडे बॅग होती त्या मुळे मी हर्ड मुसीयम मध्ये जायचं ठरवलं , दोन कारण, एक म्हणजे इथे आधी राहायचे त्या लोकांचा इतिहास, ज्यांना ही लोक इंडियन म्हणतात ते त्यांचा इतिहास आणि त्यांची कलाकृती इथे होती आणि दुसरं म्हणजे ते मुसियम स्टेशन जवळ होत, त्या मुळे मी माझी बॅग सहज ओढत नेऊ शकत होतो (बाकीचे सायन्स ची ठिकाण होती आणि मी सायन्स पेक्षा कला आणि इतिहासात रमणारा आहे, हे तिसरं कारण, थोडं जास्त खर).
इथे आल्यापासून मला एक मोठी उत्सुकता होती कि इतक्या मोठ्या जागेत राहायचं तरी कोण? म्हणजे जिथे एका टोका पासून दुसऱ्या टोका पर्यंत ३ ते ४ तास (विमानाने) जायला लागतात तिथे कोण राहायच? निर्मनुष्य तर नक्कीच नसणार, भाषा तरी काय होती? ही लोक इंडियन म्हणतात पण आपण इथे न्हवतो..कधीच ... मग? तो कोलंबस इंडिया शोधायला गेला आणि तो इथे आला आणि इथल्या लोकांना इंडियन म्हणाला म्हणून हे इंडिअन? फक्त केस काळे आणि गोरे नाहीत म्हणून इंडियन? मेक्सिको मध्ये सगळे स्पॅनिश बोलतात कारण स्पेन ने इथे इसवीसन १६०० ते १८५२ पर्यंत राज्य केले आणि ह्यांना ओरबाडून नागवे केले, तरी ते स्पॅनिश बोलतात मूळ भाषाच नाही. पण ते खाली होते इथे थंडीत बर्फात कोण होतं? इथे वाळवंट पण आहे तिथे कोण होत? जंगलात कोण होत? दर्या आहेत डोंगर आहेत मोठी माळ रान आहेत (होती) तिथे कोण होत ? खूप प्रश्न होते आणि मला नकळत इथे थोड्या प्रश्नाचा उलगडा झाला.
हे हेर्ड मुसीयम म्हणजे तथाकथित इंडियन लोंकाची संस्कृती आणि इतिहास दाखवणार एक मुसीयम, दहा बारा हजार स्केयेर फुटात दहा बारा शतकांचा इतिहास दाखवण्याचा (केविलवाणा) प्रयत्न आहे ... आपण खूप बरे. आपण इतके आघात , आक्रमण सहन करून संस्कृत जपलं, कितीही लोकांना खोटं वाटलं तरी रामायण, महाभारत जपलं पुराण, जपली, वेद बहुरू दिलेत नवीन कल्पना स्वीकारल्या सगळ्या भाषा जपल्या आता जलद गतीने गुलाम गिरी कडे चाललोय ते सोडा, पण आपण अजून १४ अधिकृत भाषा बोलतो त्यांच्या पोट जाती १४०० त्यांची स्वरूप १४०० ते सगळं जपलय, खूप जपलं, इथे येऊन त्या आधीच्या जे कुणी असेल त्यांचा इतिहास नेस्तनाबुत झालेला पाहून वाटत कि आपले पूर्वज खरच महान होते .... जितक विज्ञान पुढे जायला महत्वाचं तितकाच मुळांना बळकट करायला इतिहास गरजेचा .. इंग्रजी शिकण्याकरता मराठी विसरायचं कारण नाही हे इतिहास शिकवत. आईची ममा झाली तरी माया हि आईची असते हे तीथे ममा चा हग (काय पण शब्द निवडलाय) कमी पडतो ... असो
इथे हर्ड मुसीयम मध्ये हे मला पाहायला मिळणार म्हणून मी आलो .... इथे दोन भाग आहे, एक म्हणजे इथला इतिहास आणि इथली (म्हणजे इंडियन्स ची)संस्कृती .. इतिहास गोऱ्या साहेबानी लिहिलाय आणि संस्कृती तोच गोरा साहेब दाखवतो आपण यातून बोध घायचा ... ..