अमेरिका ११
कॅलिफोर्निया -लॉस अँजेलिस -बेव्हर्ली हिल्स - हॉलिवूड - कोडॅक थेटर - युनिव्हर्सल स्टुडिओ ......हे सगळं माझं बघून झालं , म्हणजे थोडं (फार नाही) जे पाहायचं असत ते म्या पाहिलं ना लेको ....
६ च विमान पकडून साडेचार तास (विमानाने) प्रवास करून साडे सातला LA , म्हणजे लॉस अँजेल्स ला आलो , साडे तीन तासाचा फरक असल्या मुळे हा कारनामा , परत जाताना आखा दिवस गेला कारण तेच सडे तीन तास उलटे झाले.
एअरपोर्ट वरून आम्ही आधी बेव्हर्ली हिल्स ला गेलो, तिथे जाताना अशी गरिबीशी अमेरिका दिसली, बांद्रा ईस्ट ते वेस्ट कसा असेल प्रवास? म्हणजे अगदीच ईस्ट इतकं नाही पण थोडं गरीब . तर तो एकदम गरीब एरिया आणि लगेच पाच मिनटात एकदम पॉश टकाटक, जिथे अति श्रीमंती तिथे अति गरिबी असतेच का? देश बदलला खंड बदलला तरी तेच , काहीतरी प्रॉब्लेम आहेसच ....
खूप पिक्चर मधून मी ते हॉलिवूड पाहिलं होत ..आहे. त्या मुळे तिथे बाहेर गाडीतून बघताना मला खूप नवीन असं काही वाटलं नाही, पण स्वाती आणि मी गाडीतून उतरलो आणि एकदम ते वार अंगात गेलं , एक मोठा फरक म्हणजे इथे , (इथे म्हणजे हॉलवूड ला) खूप थंडी नसते आणि मी आलो होतो -३ डिग्री मधून त्या मुळे तिथे अंगावर चार पाच कपडे घालूनच फिरायचो , हॉलिवूड ला फक्त शर्ट आणि वरती हुडी, त्या मुळे अक्षरशः वार अंगात भिनल .... पण काय ते वातावरण राव , खूप लोक, हसणं खिदळण, त्यात रस्त्यात काही लोक स्पायडर मॅन, सुपर मॅन , हल्क अशी निरनीराळ्या पात्रांचे कपडे घालून वावरत होती नुसतं भिर भिर नजर, एक म्हणजे इथे गर्दीत सुद्धा शिस्त आणि स्वच्छता हे दोन्ही असत, त्या मुळे चालायला बर वाटत, त्यात हवामान थंड आजूबाजूला जरा बरे चेहरे, वातावरण आनंदी. गाडीतून उतरल्यावर एवढा मोठा बदल जाणवत असतानाच पाया खाली एकदम मायकल जॅक्सन आला ... त्या रस्त्यात फूटपाथ वर सगळ्या नट , नट्यांची नाव कोरलेले अनेक दगडं लावली आहेत, म्हणून स्वाती म्हणाली, "अरे खाली बघ काय"? तर सगळे हॉलिवूड स्टार, मला काय खूप लोकांना ओळखता नाही आलं, माफक आठ दहा नट नट्या ओळखीचे . त्यांना ओलांडून आम्ही कोडॅक थिएटर, म्हणजे डॉल्बी थेटरात गेलो, इथेच ते ऑस्कर अवॉर्ड्स होतात. तो मोठा जिना पहिला (तिथे मी फोटो पण काढले ), त्या वरून मी चालत गेलो (थिएटर बंद असत) आणि मग आपल्या मॉल तसंच . फूड कोर्ट आणि दुकान असं लागत आणि तिथून वरच्या मजल्यावरून , समोर तो फेमस हॉलीवूड असं लहिलेला बोर्ड दिसतो डोंगरातला . त्या डोंगरात पण जात येत पण तिथे काही गेलो नाही मी कारण तो डोंगर आहे आणि त्यात काही नाही असं मला सांगितलं आणि जवळून बोर्ड पण दिसत नाही . दुरून डोंगर साजरे हि म्हण इथेच जन्माला आली असणार.
मग आम्ही नको त्या वस्त्तु नक्को त्या भावात घेतल्या, म्हणजे ते फ्रिज ला लावायचा लोह चुंबक, छोटे ग्लास ज्यावर हॉलिवूड लिहिलं होत असं अनेक. ... आणि आम्ही बेव्हर्ली हिल्स फिरलो (गाडीतून), पण काय सांगू एकदम पॉश दिसायलाच श्रीमंत ... म्हणजे एकेका घराची किंमत कैक लक्ष डॉलर्स असेल, पण दिसायला पण छान होती घर, नुसतं पॉश असं नाही. श्रीमंती अशी वाहत होती ..तिथेच त्या ब्रॅनजेलिनाच घर आहे म्हणे, आता अँजेलिना राहते म्हणा त्या ब्रॅड ला पिटा ळला ... असो आपल्याला काय करायचंय? पण ते वार शिरलं ना मगाशी, म्हणून आपल थोडं गॉसिप , बाकी काही नाही . तिथे आम्ही उगीच गिरी गिरी फिरलो (मजा आली पण ) सगळी श्रीमंती बघत आणि मग ग्रिफिथ observatory ला गेलो ताऱ्या तुन तारे बघायला . म्हणजे जागा पण काय निवडली बघा .. observatory म्हणजे जिथे तारे बघतो ते आणि बॉलिवूड जिथे तारे राहतात ते अगदी एक मैलावर वर .... मैला वरून आठवलं , इथे किलोमीटर नाही, म्हणजे किलोमीटर आहे हो, पण अंतर , गती, हे सगळं मैलांनी मोजतात आणि आपण मुंबईत वेळेने अंतर मोजतो, म्हणजे सकाळी ९ वाजता बोरिवली ते अंधेरी २ तास, दुपारी एक आणि पहाटे पंधरा मिंट. तिथे शहाणी आहेत लोक, मैल म्हणजे वेळ असं एकच समीकरण ठेवतात .
मी जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत, हॉटेलात आलो, तेव्हा वाण सामान आणायला बाहेर पडलो आणि त्या रिसेप्शन वरच्या माणसाला विचारलं, कि वॉलमार्ट किती लांब आहे? पाच मिंट म्हणाला, म्हंटलं अरे वाह फारच छान, कुठच्या दिषेला? असा सरळ जाऊ का? त्यानी एक भुवई उंच करून विचारलं? कसा जाणार? म्हंटल पाई , तिथे सगळेच गाडी घेऊन फिरतात (पट्टेवाला सुद्धा), ५ मैल आहे म्हणाला , गाडीने पाच मिंट (बोरिवली ते अंधेरी जवळ पास तेवढंच आहे अंतर , एक दोन मेल जास्त फार तर ) चालत नाही असं म्हणाला.
तर सांगायचा मुद्दा असा कि तारे आणि चांद तारे हे हाकेच्या अंतरावर आहेत इथे हॉलीवूडला.
ती ग्रिफिथ observatory अजब आहे. एका टेकडी च्या कड्यावर आहे, डोंगर म्हंटलं असत पण एवढा उंचीवर नाही पण अगदी पर्वती इतकं जवळ पण नाही, पण वर गेलं फार वरती वाटतं कारण एकी कडे थोडी दरी टाईप्स आहे (आणि इथून पण तो फेमस हॉलिवूड चा डोंगर दिसतोच) आणि बाकीकडे बघितलं तर लॉस अँजेल्स शहर दिसत , उन्हाळल्यात छान दिसत म्हणे, पण थोडे ढग होते मी गेलो तेव्हा म्हणून नीटस नाही दिसलं. पण तरीही एरवी छान दृश्य असेल ह्याचा अंदाज आला . अमेरिकन सैन्य , (म्हणजे कुणी एके काळी ब्रिटिशच असलेली लोक)असे डोंगर दर्या दिसल्या कि जाऊन त्यावर ताबा घायचे. असं करत करत अक्खा देश काबीज केला. त्यातला हा एक डोंगर. थोडा इतिहास सांगायचा तर युरोप वरून आलेला साहेब आधी पूर अमेरिकेत शिरला अटलांटीक ओशियन मधून, मग आहे पश्चिमेला आला. तसे फ्रेंच, स्पॅनिश आणि डच पण आले होते, पण इंग्रज वरचढ निघाला आणि अक्खी अमेरिका घेऊन बसला. तर हा डोंगर कमावणारा माणूस, म्हणजे कुणी मेजर जनरल असेल तो त्याच नाव ग्रिफिथ. त्याला एके दिवशी दुर्बिणीचा शोध लागला आणि मग तारे बघायचा छंद लागला (हॉलिवूड नंतर आला इथे ) . मग त्याने हा डोंगर लोकल मुनिसिपालिटी ला दान दिला हि observatory बांधायला, एक अट होती , ती म्हणजे नाव त्याचं द्यायला लागेल. मुनिसिपालिटीच ती इथली काय आणि तिथली काय? खूप वर्ष थांबून, मग ते हो म्हणले. असं राज रोज पणे फुकट घायची सवय नसते बहुतेक मुनिसिपालिटी ला, टेबला खालून दिल असत तर लगेच घेतलं असत.
तर इथे ते सूर्यवरच घड्याळ आहे, म्हणेज सावली वरून वेळ कळते ते (जे आपल्या जयपूरच्या जंतर मंतर मध्ये आहे आणि ते ह्यांच्या खूप आधी बांधलेल) आहे आणि आपली सोलर सिस्टिम मस्त जमिनीवर आखलेली आहे. खूप छान मनोरंजक बांधून काढलंय. आत पण बरीच चित्र देखावे दुर्बिणीतून दिसणारे तारे आहेत. म्हणजे एक भिंत केली आहे आपल्या सिनेमा हॉलचा पडदा असतो ना? तशी आणि बालकनीत दुर्बिणी , त्यातून बघितलं कि तुम्हाला कळत कि त्या पडद्यावर टिम्ब टीम्ब नसून, आपली गॅलॅक्सि आहे. म्हणजे आकाशात बघितलं कि तुमहाला जस दिसेल तस महाल दुर्बिणीत दिसत. दोन तीन माजले आहेत, वर गच्चीत एक मोठी दुर्बीण आहे, खूप जुनी जिथून तो गिल्बर्ट सगळं आकाश बघायचा ती. ती नेमकी बंद होती (बंदच असणार, नशीब, दुसरं काय?) अजून कार्यरत आहे ती.
खाली दुकान आहे त्यात तुम्ही पुस्तक किव्हा वस्तू घेऊ शकता ज्यात तुम्हालgravity , galaxy सगळे ग्रह ह्यांची माहिती मिळते. वेगळं आहे. तिथेच एक हॉटेल आहे (ते टुकार आहे). दोन छोटी थिएटर आहेत, त्यात ते छान माहिती पट दाखवतात. आम्ही एक शो पहिला त्यात सगळ्या observatory ची माहिती आहे म्हणजे तुम्ही काय पाहायचं? ते सांगतात (आम्ही ते शेवटी बघितल म्हणा जाऊदे) आणि हे सगळं तो स्टार ट्रेक मधला मिस्टर स्पॉक सांगतो , जुन्या स्टार ट्रेक मधला लिओनार्ड निमॉय. मस्त आहे अजून, मला काय सगळ्यांचाच आवडता होता. ते सगळ पाहून दमलो मी. अजून काही बाही असेल पण इतके तारे बघून पोट भरलं , म्हणून आम्ही निघालो. खूप ट्रफिक होता , पण आमची गाडी आम्ही टेकडी खाली उभी केली होती म्हणून बर झालं.
दमून बघून मग मी स्वातीच्या घरी, म्हणजे ६० मैल (तरी सुद्धा साठच मिंट ) जायला निघालो. वाटेत थोडं ट्रफिक लागलं कारण ख्रिसमसची सुट्टी होती, म्हणून सगळेच घरा बाहेर पडले होते. पण तरी निवांत आलो....