Thursday, May 12, 2016

सापुतारा

सापुतारा 

गुजरातच एकमेव hill station अशी जाहिरात असते. आता कस  आहे न? एकदा दीक्षित च्या प्रेमात पडलात कि मग देसाई /  पटेल कितीहि सुंदर  दिसत असल्या  (अस समजा )तरी माधुरी ला तोड नाही.

म्हणजे थोडक्यात माथेरान महाबळेश्वर , आंबोली ही ठिकाण पाहिलं कि  मग सापुतारा जरा बेताचच वाटत. एक तर मी उन्हाळ्यात गेलो होतो . वणी हून सगळ्यात जवळच  म्हणून जाउन आलो. आमच resort  http://www.anandopalms.com   हे महाराष्ट्रात होत , एक सहा किलोमीटर अलीकडे गुजरात हून म्हणजे सापुतारा हून. दोन फायदे एक म्हणजे शाकाहारीच  खायची जबरदस्ती  नाही (मी शाकाहारीच खाल्लं, पण बंदी घातली कि मला चेव येतो ) आणी  मद्य (दारू)मिळते .

Resort तस   posh आहे (खिश्याला जरा जड आहे), पण एकदा आत गेलो  कि मग बाहेर यायची गरज नाही , जिम , swimming pool , billiards , chess, carom सगळच आहे .  rooms एकदम आलीशान परिसर पण सुरेख. अंगण आहे आणि त्यात झोपाळे लावले आहेत आराम खुर्च्या सगळ चैनीच सामान आहे . रात्री आराम खुर्चीत पहुडून मी चांदण  पाहिलं तसच आहे जस लहान पाणी होत, मुंबई मध्ये अस आकाश नाही दिसत म्हणजे एकदम एवढ सगळ एकत्र , मला आठवत लहान पणी आम्हाला संपूर्ण लोकल ट्रेन बघायला आवडायची म्हणेज आडवी, तेव्हा नऊच  डबे  होते , दहिसर पुला जवळ  दिसायची, एकदम सही वाटायचं  म्हणजे मोटार म्यान आणी  गार्ड चा डबा  एकदम दिसायचा , तस मला  आकाश दिसल अख संपूर्ण एकदम एका नजरेत, (ध्रुव तारा सोडल्यास मला काहीच  ओळखता येत नाही) मग त्यातला तारा कोणता ग्रह कोणता हे ओळखण्यात मस्त   वेळ गेला .

Resort च्या मागे एक  किल्ला आहे हातगड नावाचा, सहाला बंद होतो पण उन्ह खूप असल्यामुळे  रद्द केल जाण. वर जाते गाडी, मग पायऱ्या आहेत आणि आत तलाव आणि  टेकडी आहे . पण तिथे लोक दारू घेऊन जातात आणि फोटो काढतात हल्लीच एक माणूस selfie च्या नादात वरून पडून मेला अशी बातमी मला तिथे उभ्या असलेल्या माणसाने दिली तो बहुदा तिथला गार्ड असेल. तिथेच खाली शेवटच दारूच दुकान आहे, म्हणजे गुजरातला शिरायच्या आधी किव्हा सगळ्यात पाहिलं महारष्ट्रात आल्यावर त्या  मुले चंगळ असते तिथे .  

नाही म्हणायला एक दिवस मी सापुतारा बघून आलो पण गाव अगदीच छोट आहे पावसाळ्यात छान वाटेल, दुपार होती रण रणत  उन्ह , मग आम्ही एक थाळी खालली गुजराती (महाग वाटली मला 280 का काहीतरी होती) . एका आजी बाई कडून मग आम्ही straw berry घेतल्या काकडी कैरी आणि गवती चहाघेतला, ढीग भर दिला तीन दहा रुपयात . साडी गुजराती पण अस्खलित मराठी , दोन्ही भाषा येतात म्हणाली  border आहे न म्हणून. खूप हसरी होती बाई सून आणि नातवंड आहेत मुलगा गेला  म्हणाली , म्हणून एवढ्या उन्हात बसावा लागत नाहीतर घर चालणार कस? पण आनंदी होती बाई , बहुदा अशी माणसं आपल्याला मुद्दाम भेटतात  (का कुणी भेटवतो कोण जाणे) ही जाणीव करून द्यायला   कि एक वर्ष पगार नाही वाढला म्हणून आपण कटकट करतो ही बाई बघ (सत्तर असेल वय), तरी गाडा हाकते आहे आणि आनंदी आहे कंटालेली  कावलेली  नाही. आमच्या कुटुंबाने दोन आइस क्रीम घेऊन दिल  आजीला , एवढ मोठ बोळकं दाखून हसली, झाकण पण पुसून खाल्ल, गाडीच्या  आरश्यातून  बघितल तेव्हा तिने हळूच डोळे टिपल्या च जाणवल. इतके कष्ट तिला रडवू शकले नसतील पण एका दहा रुपयाच्या  आइस क्रीम ने डोळे ओले केले तिचे. सापुतार्याला जाण   सार्थ ठरल .  अजून काही तरी घ्यायला हव होत अस वाटल ......घेतल्या पेक्षा दिल्याने समाधान वाटत हे जाणवल.

तर सापुतारापाउसात  जाईला चांगला आहे, पण मुंबई हून उठून जाण्या इतकं  काही नाही एक तर हॉटेल चे दर दर मला हात गडच्या किल्ल्या पेक्षा उंच वाटले , केरळ ला निम्या किमतीत चांगल मिळाल होत हॉटेल. पण नाशिक/वाणी ला असाल   तर एक दोन दिवस हरकत नाही , अजीबात अपेक्षा ठेऊन  जाऊ नका, जे मिळेल दिसेल त्यात समाधान मना खरच सांगतो Enjoy कराल.