मुनिक - जर्मनी - 4
आपल्याला सगळेच गोरे सारखे दिसतात आणि वाटतात पण जर तुम्ही थोडे देश फिरलात तर त्याचांत किती फरक आहे ते समजतजर्मन माणूस मला जरा गंभीर वाटला , म्हणजे इंग्रज कसा शिष्ठ दिसतो फ्रेंच माणूस मस्कर्या किव्हा एकूणच प्रेमात दिसतो, डच माणूस साधा वाटतो आणी संसारी तसा हा जर्मन जरा धीर गंभीर वाटला, म्हणजे दुकानात गेलो कि माणस
"Hello" अस म्हणतात पण एकूण उगाच अघल पघल न करणारा वाटला, मी आलो म्युनिक ला तेव्हा पण तो इमिग्रेशन वाला अजीबात हसला नाही एक तर साडे सहा फूट होता … रुंदीला. मी उगीच निष्फळ प्रयत्न केले good
morning वगेरे म्हणायचे ,
taxi वाली आजी होती, सिगरेटचा वास येत होता, ती पण फक्त आत बसताना हसली बाकी गंभीर, हॉटेलात तर काय मज्जा, तीन पर्यंत खोली नाही अस म्हणणारा माणूस …. पण मला वाटत त्यांच्या इंग्रजी न येण्या मुळे असेल , मुंबईचा भैय्या बोलेल का तुमच्याशी इंग्रजीत?
पण ही लोक परिस्थिती मुळे असेल का काही असेल, आहेत एकदम भक्कम रुंद आणि उंच पुरी कष्टकरी दिसतात शेक ह्यांड केला कि हात तुटायला हवा आणि warm आहेत . एक तर अखंड युरोप सायकल प्रेमी दोन वरशाच मुल कि ऐशी वर्षांची आज्जी सारे सायकल वर फिरत असतात आणी सगळे जण काहीतरी खेळ खेळत असतील अस वाटत, फुटबॉल तर हमखास आपण कस क्रिकेट खेळतो (कुणी एके काळी असेल, हल्ली मोबाईल खेळतो) तस फूटबोल आणि क्रिकेट ला कस सगळ्यांना व्यायाम नाही होत बॉलर लाच होतो तस नाही फुटबॉलच सगळे मर मर धावतात. बर्फ पडला कि आईस स्केटिंग करतात पण व्यायाम करतातच.
इकडे लोकांच बियर वर फार प्रेम आहे बार मध्ये लहान मुल आज्जी आजोबा सगळे असतात, दारू नाही पीत कुणी आणि आपल्या सारखा नसतो बार, इथे लोक अतिरेक नाही करत कसला आणि सगळ एन्जोय करतात. आठला हाफिसात येतात, पाचला घरी मग खेळ आणि दारू आणि भटका. खाईचे काहीच चोचले नाहीत एक तर कच्च नाहीतर उकडलेल, कशाला हवाय रांधा वाढा ? आणि थंड असत सगळ वातावरण अन्न होतंय कशाला खराब?लोक सिगरटि फार ओढतात इथे, सगळेच जवळ पास (अस मला वाटल बुवा), सिगरेटची थोटक काय ती दिसतात रस्त्यात बाकी कचरा नाही, गाडीत बंदी आहे काही स्टेशनात पण आहे, दुकान नाही म्हणा इथे पानाची पण स्टेशनात सुधा मशिन्स आहेत सिगरिटिचि, थंडीच एवढी असते कि ओढावी लागताच अश्णार, मी पहिल्या दिवशी पाटील आणी कुटुंब ह्यांच्या बरोबर ज्या खीम्झी कासल पाहायला गेलो तेव्हा आमची गाईड एक बाई होती आणि इथे तश्या सगळ्याच कमान करता बायकाच पुढे असतात , Airport वर पण taxi वाली आजी होती आणि गाईड म्हणून पण बाई, ती वास्तविक रोमन होती, पाच वर्ष अमेरिका, पाच वर्ष ब्राझील इथे पण पाच वर्ष झाली होती तिला. ती इतर वेळेस लोकांना इटालियन आणि फ्रेंच शिकवते म्हणाली. स्टेशन वर enquiry ला पण बाई होती होती, एक दोन दा ट्रेन बस चालवताना बाइका दिसल्या , दुकानात हॉटेलात बाइका जास्त. गाईड तर बाइकाच.