शीत कडा :
मी नाशिक ला अनेक वर्ष जातो, लहान पणा पासून आम्ही दर वर्षी सप्तशृंगी ला जातो वाणी ला आधी गड चढायचो आता गाडी जाते थेट पर्यंत, नशीब पायर्या आहेत ५०० , घाम आल्या शिवाय काही साध्य होत नाही.
आम्ही नेहमी नाशकाला राहायचो अजून तिथेच राहतो, मग सकाळी उठून वणी. खूप वर्षांनी आम्ही ह्या वर्षी नाशकात थोडा वेळ मिळाला, म्हणून गोदावरी वर गेलो ....अजिबात नका जाऊ आयुष्यात , आहो किती घाण , म्हणजे स्टेशन वरचा सौचालाय स्वच्च असेल , म्हणजे आम्ही रिक्षा तून मालेगाव stand ला उतरलो तिथून एका रस्त्याने खाली आलो आणि ही गोदावरी आणि ही घाण, मिठी नदी जरा जास्त बरी दिसेल , भिकारी जास्त माणसं कमी , शिव कालीन देवळ आहेत सगळी , आम्ही एकात पण नाही गेलो नाहीच जावसं वाटलं, नाही म्हणायला साई बाबांचं एक नवीन देऊळ होतं बाहेरचं बाजूला तिथे गेलो , सवयी प्रमाणे कुटुंबाने बरीच खरेदी केली (आम्ही कुठे हि गेलो तरी चार पैशे खर्च करून येतो दगड धोंडे तरी घेतोच ). रिक्षा केली आणि परत हॉटेलला आलो , ते रिक्षा वाले तर गुंडच , मीटर वगेरे अश्या फाजील गोष्टी वगेरे ते बंद करून ठेवतात. आपण थोडं बोलावं, म्हणून जास्त पैशे सांगतात , मग आपण जरा त्यांचाशी बोलतो त्यांना बर वाटत, चार पैशे कमी घेतले म्हणून आपल्याला बर वाटत .
आम्ही तिथे कामात मध्ये जेवलो , जेवण छान होता फारच छान , पण वेळ घेतात फार , असो पण त्या Waiter ने तरी आम्हाला feedback form दिला. आवडला मला तो माणूस पुढे जाईल.
वणीचा रस्ता आता चांगलाय, आपल्या राज्याला शोभत नाही, पण ते डोंगर तशेच आहेत अजून , मला अजून हूर हूर लागते गड जवळ आला कि आता काय थेट वर पर्यंत गाडी जाते , गाडी घेऊन जायला एवढी मजा नाही येत , गड चढून जायला फार मजा यायची . अजून साधा आहे गाव तसं, नाही म्हणायला cell आले आहेत सगळ्यांकडे कपडे चांगले घालतात. लहान पणी आम्ही ज्या गुरुजींकडे जायचो ते तर आमच्या कडून पैशे घेऊन मग स्वयपाक करायचे सामान आणून , आता ती स्तीती नाही राहिली .मी काही अधिक नाही लिहित ब्राह्मणान बद्दल , दोन्ही कडून गळचेपी होते.
तर ह्या वेळीस पहिल्यांदा मी शीत कडा आणि तळ बघितलं. शीत कडा, म्हणजे एक सरळ सोट कडा आहे, त्या कड्या वरून एक बाई बैलगाडी घेऊन खाली गेली होती एक नवस फेडायला , बैल गाडी ची चाक पण दिसतात अजून , वरून एखादी घोष्ट खाली पडली कि भाता च्या शीता इतकी बारीक तुकडे होतात म्हणून हे शीत हे नाव.
गर्दी वाढली आता वाणीला कधी कधी बर वाटत, कधी नको वाटत , पण मला नेहमी निघताना दुख होताच , बाईकोला पण कायम दर्शन झाला कि डोळ्यात पाणी येतं, एक श्रद्धा स्थान असावा म्हणतात तेच आहे आमचं श्रद्धास्थान .