Sunday, June 21, 2015

मुनिक - जर्मनी - 4

मुनिक - जर्मनी - 4

आपल्याला सगळेच गोरे  सारखे दिसतात आणि वाटतात पण जर  तुम्ही थोडे देश फिरलात तर  त्याचांत किती फरक आहे ते समजतजर्मन माणूस मला जरा गंभीर वाटला , म्हणजे  इंग्रज कसा शिष्ठ दिसतो फ्रेंच माणूस मस्कर्या किव्हा एकूणच प्रेमात  दिसतो, डच माणूस साधा वाटतो आणी संसारी तसा हा जर्मन जरा धीर गंभीर वाटला,  म्हणजे दुकानात गेलो कि माणस "Hello" अस म्हणतात पण एकूण उगाच अघल पघल करणारा वाटला, मी आलो म्युनिक ला तेव्हा पण तो इमिग्रेशन वाला अजीबात  हसला नाही एक तर  साडे सहा फूट होता रुंदीला.  मी उगीच निष्फळ प्रयत्न केले good morning वगेरे म्हणायचे ,
taxi वाली आजी होती, सिगरेटचा वास येत होता, ती पण फक्त आत बसताना हसली बाकी गंभीर, हॉटेलात तर काय मज्जा, तीन पर्यंत खोली नाही अस म्हणणारा माणूस . पण मला वाटत त्यांच्या इंग्रजी येण्या मुळे असेल , मुंबईचा भैय्या बोलेल का तुमच्याशी इंग्रजीत?

पण  ही लोक परिस्थिती मुळे असेल का काही असेल, आहेत एकदम भक्कम रुंद आणि उंच पुरी कष्टकरी दिसतात शेक ह्यांड केला कि हात तुटायला हवा आणि warm  आहेत . एक तर  अखंड युरोप सायकल प्रेमी दोन वरशाच मुल कि ऐशी वर्षांची आज्जी सारे सायकल वर  फिरत असतात आणी  सगळे जण  काहीतरी खेळ खेळत असतील अस वाटत, फुटबॉल  तर हमखास आपण कस क्रिकेट खेळतो (कुणी एके काळी असेल, हल्ली मोबाईल  खेळतो) तस फूटबोल आणि क्रिकेट ला कस सगळ्यांना व्यायाम नाही होत बॉलर  लाच होतो तस  नाही  फुटबॉलच सगळे मर मर धावतात. बर्फ पडला कि आईस  स्केटिंग करतात  पण व्यायाम करतातच. 

इकडे लोकांच बियर वर फार प्रेम आहे बार मध्ये लहान मुल आज्जी आजोबा सगळे असतात, दारू नाही पीत कुणी आणि आपल्या सारखा नसतो बार, इथे लोक अतिरेक नाही करत कसला आणि सगळ एन्जोय करतात. आठला हाफिसात  येतात, पाचला घरी मग खेळ आणि दारू आणि भटका. खाईचे काहीच चोचले नाहीत एक तर कच्च नाहीतर उकडलेल, कशाला हवाय रांधा वाढा ? आणि थंड असत सगळ वातावरण अन्न होतंय कशाला खराब?लोक सिगरटि फार ओढतात इथे, सगळेच जवळ पास (अस मला वाटल बुवा), सिगरेटची थोटक काय ती दिसतात रस्त्यात बाकी कचरा नाही, गाडीत बंदी आहे काही स्टेशनात पण आहे, दुकान नाही म्हणा इथे  पानाची पण स्टेशनात सुधा मशिन्स आहेत सिगरिटिचि, थंडीच एवढी असते कि ओढावी लागताच अश्णार, मी पहिल्या दिवशी पाटील आणी  कुटुंब ह्यांच्या बरोबर ज्या खीम्झी कासल पाहायला गेलो तेव्हा आमची गाईड एक बाई होती आणि इथे तश्या सगळ्याच कमान  करता बायकाच पुढे असतात , Airport वर पण taxi वाली आजी होती आणि गाईड म्हणून पण बाई, ती वास्तविक रोमन होती, पाच वर्ष अमेरिका, पाच वर्ष ब्राझील इथे पण पाच वर्ष झाली होती तिला. ती इतर वेळेस लोकांना  इटालियन आणि फ्रेंच शिकवते म्हणाली.  स्टेशन वर enquiry ला पण बाई होती होती, एक दोन दा ट्रेन बस चालवताना बाइका दिसल्या , दुकानात हॉटेलात बाइका जास्त. गाईड तर बाइकाच.


Wednesday, June 3, 2015

मुनिक - जर्मनी - 3

मुनिक - जर्मनी - 3

मुनिक - हे शहर अगदी हल्ली बांधलय म्हणजे पुन्हा बांधलय.  दुसऱ्या  महायुद्धा नंतर ऐशी ते नौवड टक्के शहर allied forces नी bomb  टाकून पाडून टाकल  होत त्यांचा एक महाल सुद्धा पडून टाकला  होता, तो ह्या  लोकांनी पुन्हा बांधलाय. इतके  वर्ष मी कुठे गेलो कि गाईड मला सांगायचे कि कस मोगलांनी किव्हा इंग्रजांनी पाडल किव्हा लूटल आणी मी हळ हळ करायचो, पण हे शहर बघून वाटल कि अपण  का नाही बांधल सगळ पुन्हा? ही लोक खूप कष्टकरी आहेत  आणि तब्यतिने पण एकदम तगडे  उंच पुरे आणी मजबूत बांधा. उगीच खंत करत नाही बसले पुनश्च सगळ उभ केल आणि आज जगात सगळ्यात भक्कम अशी economy ह्यांची आहे. कार मध्ये ह्यांना धरणारे कमीच BMW  Audi आणि Merecedes हे इथलेच Audi म्हणजे VW (फोक्स्वेगन असा उच्चार). BMW म्हणजे बवेरिअन मोटर वर्क्झ , बवेरिया हे राज्य जीथे  म्युनिक आहे, राजधानी आहे म्युनिक इथली.

बवेरिया हे तस शाकाहारी लोकान साठी नाहीच, शाकाहाराच्या जवळ जाणार खाण म्हणजे अंडी , कोंबडी कुणीच खात नाही बीफ किव्हा पोर्क असा आहार, थंडी खूप असते इथे त्या मुळे हे खाण भाग आहे आपण रोज डुक्कर खाऊ नाही शकणार एक्व्ढ्या गर्मीत. ही लोक सायकल खूप हाकतात म्हणजे अगदी आजी बाई सुद्धा, खाऊन सगळ पचवतात ही  लोक. तस आम्ही केरळ ला पण पाहिलं मेनू मध्ये बीफ आणि फिश अश्या  मेन डिशेस असतात.

पाटील आणि मी बोलत होतो तेव्हा ते म्हणाले कि आपण साहेबां कडून काहीच चांगल नाही शिकलो त्या yankees कडून  नको नको तेच घेतल, दिखाऊ पणा घेतला वाह्यात वागण घेतल आणी अतीशय चुकीच अस इंग्रजी. युरोप ची माणस तशी साधी वाटतात एकदम शिस्तीत असतात  ऑफिसात आठच्या आत आणि पाच ला घरी उगा पाल्हाळ नाही घालत, खाईचे लाड नाही प्याचे नाहीत :)  बीयर ढोस्तात ते पण अगदी आजी बाई सकट. एकदा आम्ही राजवाड्या बाहेरच्या open air  बार मध्ये बसलो होतो, इथे खर तर "बार"   हा कन्सेप्ट नाहीये सगळेच दारू विकतात अगदी स्टेशनात सुधा, त्या मुळे   त्या हॉटेल ला बार म्हणजे अगदी दीक्षित ला राखी सावंत म्हणण्या सारख आहे (नको रे, काही पण उपमा, ब्योक  झाला मला ). तर तिथे आम्ही सातला उन्हात बसलो होतो (उन्हाळ्यात १० पर्यंत उजेड असतो) आणि आमच्या बाजूला एक माणूस आपल्या सात आठ महिन्याच्या मुलाला बाबा गाडीत ठेऊन एका मित्रा बरोबर बियर (इथे कुणी मला "दारू" पिताना नाही दिसल ) प्यायला बसला होता , काय मस्त म्हणजे गार्डन होत त्या राजवाड्यात तिथेच "चला बसा"  असा बोर्ड आणि लोक आनंदाने हसत खेळत बियर चा आस्वाद घेत आहेत धन्य  झाला असणार राजा. हेच एका सुखी समृद्ध आणि अर्थात सुरक्षित देशाच लक्षण नाही का? कुणी दारू पिउन दंगा करताना दिसत नाही छेड  चाड नाही, भांडण तंटा नाही आहो पोलिस सुधा नाहीत, म्हणेज असतील हो पण दिसत नाही.

मला जर्मनी  जरा महाग वाटल, म्हणजे इंग्लंड तस बर होत आणि बेल्जीयम पण, बियर वगेरे महाग आहे जेवण (बेचव तिच्यायला ) पण जरा महागच, प्रवास तसा बरा आहे आणि गाड्या पण सुबक आणि सगळीकडे. मी फक्त ट्रेन ने फिरलो बस आणि ट्राम राहिलीच. इथे ट्रेन चे ट्रक्स पण आपल्या सारखेच अगदी खडी सुधा, ही लोक खडी कुटून आणत असतील हो? बाकी रस्त्यात मारायला पण दगड  सापडणार नाही मग एवढे दगड कुठून येत असतील? पण गाड्या अगदी आपल्या मुंबई मेट्रो सारख्या चका चक. दोन कंपन्या आहेत एक U  आणि एक S  दोन एक दिवसात मला समजल ते गणित पण तरी मी खात्री करून घ्यायचो फोन करून आमच्या मित्राला (सवय, कुलपाला लोम्ब्काळून पहायचं आणि तळ  मजल्याला आलो कि परत वर जाऊन दार बंद  केलय न ? ते बघायचं) आणि हाडाचा मुंबईकर आहे  मी गाडीशी नाही जमवणार तर कुणाशी?

इथे जास्त करून लोकां कडे जर्मन गाड्याच असतात, पण आता पूर्वीच जर्मन नाही राहिलो हो अस म्हणारे लोक आहेतच , कारण लोक जपानी गाड्या पण वापरू लागले आहेत  अगदी कोरियन सुद्धा, मी इथे के मारुती स्विफ्ट पण पहिली, म्हणजे बघा, पण बसेस ट्राम सगळ्या छान, ज्या विमातळावर तश्याच आणि त्याच गाड्या बाहेर लोकांना. इथे शहरात पण घन दात जंगल आहे म्हणेज इतकी झाड आहेत आपण एक आरे करता मारामारी करतोय इथे तर आरे पेक्षा सरस झाड आम आहेत आणि जंगल सुधा. वर्षात काय महिना दोन महिने गर्मी (म्हणजे मुंबई साठी यंदा  बरीच थंडी आहे अस )बाकी  सगळ थंड दोन महिने बर्फ.

आवडल मला मुनिक राहायला चांगलंय ……